पोटनिवडणुकीचे निकाल; काँग्रेस पक्षाला मोठा धक्का

    दिनांक :28-Nov-2024
Total Views |
विश्लेषण
- अभय कुमार
Assembly by-election : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाला एकामागोमाग एक धक्के बसले आहेत. सलग दोन लोकसभा निवडणुकांमधील खराब कामगिरीनंतर काँग्रेस पक्षाला आपल्या कामगिरीच्या जोरावर विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यात यश मिळाले होते, त्यामुळे ही कामगिरी आता आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम राहणार असल्याचे दिसत होते. परंतु जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला आपली लोकसभेची कामगिरी राखता आली नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मिळवलेले मनोबल आता पूर्णपणे ढासळले आहे.
 
 
Rahul-2
 
झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबतच अनेक राज्यांमध्ये Assembly by-election विधानसभा पोटनिवडणुका ज्याचे निकाल काँग्रेस पक्षासाठी दिवास्वप्नासारखे होते. सर्वांत प्रथम पश्चिम बंगालचे उदाहरण घेऊ. तेथील सहा जागांवर पोटनिवडणूक झाली. काँग्रेस पक्षाला निवडणुकीपूर्वीच मोठा झटका बसला. कारण निवडणूकपूर्व युती राखण्यात राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला साफ अपयश आले. काँग्रेसचे ‘लाडके’ आणि ‘नैसर्गिक’ मित्र असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व घटक पक्षांनी एकमताने काँग्रेस पक्षाशी प्रकारची युती करण्यास स्पष्ट नकार दिला. सहा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्व जागा लढवल्या आणि या पक्षाला केवळ २६५७९ मते मिळाली. या सहा जागांपैकी केवळ एका जागेवर काँग्रेस पक्ष तिसर्‍या क्रमांकावर येऊ शकला. या पोटनिवडणुकीने २०२६ मध्ये होणार्‍या पुढील राज्य विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट केले असून ती निवडणूक आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधीर रंजन चौधरी यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्यानंतर ममता बॅनर्जी राज्याच्या राजकारणात आपल्याला मदत करतील, अशी काँग्रेस पक्षाला आशा होती. परंतु ममता बॅनर्जींनी काँग्रेसच्या आशा धुळीस मिळवल्या.
 
 
राजस्थानमध्ये विधानसभेच्या सात जागांवर पोटनिवडणूक झाली. या सात जागांपैकी काँग्रेस पक्षाच्या चार, तर मित्रपक्षांच्या वाट्याला तीन जागा आल्या. निवडणुकीच्या मैदानात एकट्याने उतरून काँग्रेस पक्षाने राज्यातील राजकीय पात्रतेचे वास्तव उघड केले. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत ज्या मित्रपक्षांच्या बळावर चांगली कामगिरी केली होती, त्या मित्रपक्षांकडे दुर्लक्ष करून सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयाचा काँग्रेसला जबर फटका बसला. काँग्रेस कामगिरी फारच खराब राहिली. काँग्रेसला भाजपाकडून केवळ दौसा मतदारसंघ अवघ्या अवघ्या २३०० मतांनी जिंकता आला. या पक्षाला चार जागांवर थेट लढतही देता आली नाही आणि या सर्व जागांवर काँग्रेस पक्षाची अनामत रक्कमही जप्त झाली. लोकसभा निवडणुकीतील आपली चांगली कामगिरी ही स्वबळावर नव्हे तर मित्रपक्षांच्या बळावर होती, हे राजस्थान पोटनिवडणुकीने पक्षाला दाखवून दिले आहे. काँग्रेसच्या या वाईट कामगिरीनंतर मित्रपक्ष भविष्यात अधिक जागा मिळवून काँग्रेससोबत युती करतील, हे स्पष्ट आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची वाटचाल अत्यंत खडतर राहणार असल्याचेही या विधानसभा पोटनिवडणुकांनी स्पष्ट केले आहे.
 
 
Assembly by-election : आसाम राज्यातील पाच जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल म्हणजे काँग्रेस पक्षाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. पाच जागांपैकी केवळ सामगुरी हा एकच विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. या मतदारसंघाचे आमदार रॉकीबुल हुसेन हे आसाम विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे उपनेते होते आणि राज्याच्या राजकारणात पक्षाचा प्रमुख मुस्लिम चेहरा होते. रॉकीबुल हुसेन हे सलग पाचव्यांदा या जागेचे प्रतिनिधित्व करीत होते. या मतदारसंघातून त्यांनी राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले महंत यांचाही पराभव केला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धुबरी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी देशातील सर्वाधिक मताधिक्याने बदरुद्दीन अजमल यांचा पराभव केला होता. त्यांचा मुलगा तनझील हुसैन याने या जागेवरून काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु या मुस्लिमबहुल जागेवरही भाजपाने काँग्रेस पक्षाचा २४५०१ मतांनी पराभव केला. हा भाजपचा फार विजय होता. धुबरी लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत २०१४ मध्ये ८८.३६ टक्के, २०१९ मध्ये ९०.६६ टक्के आणि २०२४ मध्ये ९२.०८ टक्के असे देशातील सर्वाधिक विक्रमी मतदान झाले आहे. या जागेवर काँग्रेसचा पराभव आणि भाजपचा प्रचंड विजय हा केवळ ईशान्येकडील राज्यांसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी मोठा संदेश घेऊन आला २००९ पासून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख बदरुद्दीन अजमल या जागेचे प्रतिनिधित्व करीत होते.
 
 
उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाला त्याची जागा दाखवून देताना त्याचा मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने ९ जागांच्या पोटनिवडणुकीत या पक्षाच्या झोळीत एकही जागा टाकली नाही. वस्तुस्थिती ही आहे की पोटनिवडणुकीतील निकालांमुळे काँग्रेस पक्ष मनोमन खुश झाला कारण इतर राज्यांप्रमाणेच उत्तर प्रदेशातही काँग्रेस पक्षाचा दणकून पराभव झाला असता. पण राज्यात सपाला झालेल्या दारुण पराभवाने काँग्रेस पक्ष मनातल्या मनात आनंदी आहे. गुजरातमधील वाव विधानसभेची पोटनिवडणूक देखील काँग्रेस पक्षासाठी राजस्थानप्रमाणेच वेदनादायी राहिली. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधून एकही जागा जिंकू न शकलेल्या काँग्रेस पक्षाला २०२४ मध्ये लोकसभा जागा जिंकण्यात यश आले. वाव मतदारसंघाच्या आमदार गेनीबेन ठाकोर यांनी २०२४ च्या निवडणुकीत राज्यातून काँग्रेस पक्षासाठी मोठी बातमी दिली. परंतु पक्षाचा हा आनंद फारकाळ टिकला नाही. वाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने काँग्रेस पक्षाचा पराभव करत २०२४ मध्ये गुजरातमधील एकमेव पराभवाचा बदला घेतला.
 
 
Assembly by-election : पंजाबमध्ये विधानसभेच्या चार जागांवर पोटनिवडणूक त्यापैकी तीन जागा काँग्रेसकडे तर एक जागा आम आदमी पक्षाकडे होती. मात्र पोटनिवडणुकीने निवडणूकपूर्व समीकरण पूर्णपणे बदलून टाकले. ‘आप’ने काँग्रेस पक्षाच्या तीनही जागा काबीज केल्या, तर काँग्रेस पक्षाने ‘आप’ची एकमेव जागा जिंकली. या पोटनिवडणुकांनी पंजाबमधील काँग्रेस पक्षाचा दुबळा होत चाललेला जनाधार आणखी उघड केला आहे. चारही जागांवर चांगली कामगिरी भाजपने ‘आप’ची पुढची लढत काँग्रेसशी नसून भाजपशी होईल, असा इशारा दिला. पंजाबच्या पोटनिवडणुकीतील स्थानिक पक्षांची वाईट कामगिरी पाहता आगामी काळात तेथील राजकारणात आप आणि भाजपा हेच प्रमुख पक्ष राहतील, हे स्पष्ट झाले आहे. बिहारमध्ये देखील काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राजदने काँग्रेस पक्षाला एकही जागा दिली नाही किंवा निवडणूक प्रचारासाठीही काँग्रेस बोलावले देखील नाही. यावरून आगामी २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल काँग्रेस पक्षाला महत्त्व देणार नसल्याचे स्पष्ट होते.
 
 
कर्नाटक आणि केरळमध्ये काँग्रेस पक्षासाठी थोडी फार आशा निर्माण करणारे निकाल दिसले. कर्नाटकात काँग्रेस पक्षाला आपल्या दोन जागा कमी फरकाने राखण्यात यश आले. त्याचवेळी भाजपाने देखील एक जागा जिंकण्यात मिळवून कर्नाटकातील आपल्या कामगिरीत सुधारणा करून काँग्रेसलाही आपल्या वाढत्या ताकदीची जाणीव करून दिली. केरळमधील दोन जागा राखण्यात काँग्रेस आणि माकपला यश आले. पण या दोन्ही जागांवर भाजपाची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. या चांगल्या कामगिरीतून भाजपाने केरळमध्ये आपल्या वाढत्या शक्तीची जाणीव करून दिली आहे.
 
 
Assembly by-election : लोकसभेच्या दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने दोन्ही जागा राखण्यात यश मिळविले. पण नांदेडच्या जागेवर काँग्रेसच्या विजयाचे अंतर ५९,४४२ मतांवरून केवळ १४५७ मतांवर आले. ही जागा भाजपाने फारच थोड्या फरकाने गमविली. वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रियंका वढेरा या राहुल गांधींपेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्यामुळे काँग्रेस पक्षात नवीन सत्तासंघर्ष निर्माण होऊ शकतो. पुढच्या वर्षी होणार्‍या दिल्ली आणि बिहार दोन राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये जर काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली नाही तर राहुल गांधींना आपली विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची प्रियांका वढेरा यांच्या सुपूर्द करावी लागू शकते, हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या वाईट कामगिरीने दर्शविले आहे.
 
(पांचजन्यवरून साभार)