बाभुळगाव,
Damage Road In Yavatmal : करळगाव घाटामध्ये गेल्या दोन वषारपूर्वी एका धोकादायक वळणावर डांबर रस्त्याचा भला मोठा भाग करळगाव घाटातील खाईत कोसळला. या बाबीला आता दोन वर्षे झाली तरीही तो खड्डा अद्याप बुजवण्यात आला नाही. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची बोटचेपी भूमिका आढळून येत आहे. गेल्या दोन वषारपूर्वी दोन रात्रंदिवस धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या एका मध्यरात्री सतत वर्दळीच्या बाभुळगाव ते यवतमाळ रस्त्यावरील करळगाव घाटातील एका धोकादायक वळणावर डांबर रस्त्याचा भला मोठा भाग अचानक रात्रीला घाटातील खाईमध्ये कोसळला. दिवस उजाडताच मोठी धावपळ झाली, वाहतूक थांबली. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मोक्यावर पोहचले. पांढरा चुना लावलेल्या दगडांनाच काही दिवसांनी तेथे पहारेकरी म्हणून लावण्यात आले. तेव्हापासून आजपयरत बाभुळगाव, देवगाव, पुलगाव, चांदूर आणि धामणगावकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावरील दोनशे फुटांचा हा खड्डा तसाच आहे. या वळणावर वाहन येताच घाटामध्ये रस्त्याचा हा कोसळलेला भाग पाहून वाहन चालकाच्या मनात अचानक धडकी भरते. यवतमाळ-धामणगाव हा सतत वर्दळीचा रस्ता आहे. रात्रभर या रस्त्याने वाहने धावताना दिसतात. मात्र संबंधितांनी हा खड्डा का भरला नाही, ते अपघाताची वाट तर पहात नसतील, अशी चर्चा आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे रस्ता अपघातात निष्पाप नागरिकांचे जीव जाऊ नये याकरिता सातत्याने धडपडत असल्याचे दिसत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे काहीही सोयरसुतुक नाही याची कल्पना येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता म.म. माथुरकर यांची या संदर्भात प्रत्यक्ष भेट घेतली असता वन विभागाची परवानगी यायची आहे, असे गोलमाल उत्तर त्यांनी दिले. या अधिकाऱ्यांचे कार्यालय व वन विभागाचे कार्यालय या दोन कार्यालयांमध्ये केवळ पाव किलोमीटरचे अंतर आहे. Damage Road In Yavatmal तरीही परवानगी संदर्भातील कागद या अधिकाऱ्याला प्राप्त करता आलेला नाही. त्याने किती वेळा पाठपुरावा केला, काय पत्रव्यवहार केला, या संदर्भातही चौकशी होणे गरजेचे आहे. करळगाव घाटातील या खड्यांमुळे मोठा अपघात किंवा मोठ्या जीवहानीची तर ते वाट पाहत नाही ना, अशी शंका या रस्याने नियमित प्रवास करणाऱ्यांना येऊ लागली आहे. आपल्या कर्तव्यात कसूर करणाèया अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.