नागपूर,
Khasdar Sanskrutik Mahotsav खासदार सांस्कृतिक महोत्सव २०१७ पासून नागपूर शहराची शान ठरला आहे, असे गौरवोद्गार रा.स्व. संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह प्रा. अतुल मोघे यांनी व्यक्त केले. खासदार सांस्कृतिक महोत्सव १३ २२ डिसेंबर दरम्यान ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले असून त्याचेे भूमिपूजन तसेच कार्यालयाचे उद्घाटन प्रा. अतुल मोघे व माजी खा. अजय संचेती यांच्या हस्ते आज सकाळी झाले. त्यांच्यासह आ. प्रवीण दटके, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, आयोजन समितीचे अध्यक्ष अनिल सोले, सचिव जयप्रकाश गुप्ता, अविनाश दीपक खिरवडकर, अॅड. नितीन तेलगोटे, मनीषा काशीकर, विजय फडणवीस व इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
Khasdar Sanskrutik Mahotsav अतुल मोघे म्हणाले की, विदर्भातील लोकसुद्धा कार्यक्रमांना बघायला व अनुभवायला या ठिकाणी येत असतात. नितीनजी गडकरींच्या संकल्पनेतील हा सांस्कृतिक महोत्सव समाजमनाला गवसणी घालणारा ठरला आहे. सोबतच जुनं-नवीन या दोन्ही गोष्टींचे, परंपरा व आजच्या काळाची अशा प्रकारची सांगड घालणारा हा कार्यक्रम आहे.समाजामध्ये विविध प्रकारचे वर्ग, वयोगट आहेत. प्रत्येक वयोगटाला या सांस्कृतिक महोत्सवामध्ये ‘आपलाही एक कार्यक्रम आहे’, याची जाणीव करून देणारा व त्या अर्थाने याच्याशी जोडणारा, असा हा आपला सांस्कृतिक महोत्सव आहे. पावसामुळे कार्यक्रम थांबलेला कार्यक्रम कालांतराने घेता आला. समाजामध्ये याने एक विश्वासार्ह्यता वाढते.
Khasdar Sanskrutik Mahotsav महोत्सवाच्या सर्वच कार्यकर्त्यांचे ‘कमिटमेंट’ आहे. त्या आधारे कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करतो. समाजाचे ते कार्यक्रम आहेत, म्हणून समाजही आपल्या भरघोस उपस्थितीने दाद त्याला देत असतो. सकाळी संस्कारक्षम, धार्मिक, सर्व वयोगटाच्या लोकांचे कार्यक्रम व संध्याकाळी मनोरंजन, त्यासोबतच ज्ञान प्रबोधन या दोन्ही कार्यक्रमांची एक मोठी रेलचेल सात दिवस राहणार आहे. या निमित्ताने शहर म्हणून एक चांगली ओळख खासदार सांस्कृतिक महोत्सवाने आली आहे. ती निरंतर राहो, त्यासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग असावा, असे ते म्हणाले. हा महोत्सव आयकॉनिक झाला असल्याचे अजय संचेती म्हणाले. प्रास्ताविक अनिल सोले, संचालन बाळ कुलकर्णी, आभार प्रदर्शन जयप्रकाश गुप्ता यांनी केले.