नागपूर,
International Day of Persons with Disabilities : दिव्यांग जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी पत्रपरिषदेत दिली. जि.प. व रोटरी क्लब ऑफ नागपूर व्हिजनच्या संयुक्त विद्यमाने १ ते ४ डिसेंबर दरम्यान उमंग हा संगीतमय कार्यक्रम सिव्हील लाइन्स येथील सेंट उर्सुला शाळेच्या होणार आहे.
International Day of Persons with Disabilities : येत्या ३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता गांधीबाग ते चिटणीस पार्क मार्गावर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहर व ग्रामीण भागातील ८३ शाळेतील १२०० दिव्यांग विद्यार्थ्यांचा रॅलीत सहभाग राहणार आहे. याप्रसंगी जवळपास ५०० दिव्यांग विद्यार्थी सहभागी होईल. जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे चिटणीस पार्क येथे होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्वेन्शन सेंटर येथे सुध्दा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय दिव्यांग क्षेत्रात विशेष कार्य करणार्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.