पोलिस आयुक्तांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त विजेत्यांचा सन्मान

    दिनांक :29-Nov-2024
Total Views |
नागपूर,
महालेखाकार कार्यालयाच्या वतीने ऑडीट सप्ताह-२०२४ निमित्त Painting Competition चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या विजेत्यांना पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांच्या हस्ते रोख देण्यात आले.
 
 
audit-week
 
Painting Competition : यात प्रामुख्याने अ गटात वायुसेना नगर शाळेची विद्यार्थिनी अंशीका गौर, द्वितीय रैना शर्मीन, तृतीय फरहान अहमद, प्रोत्साहान पुरस्कार शौर्या रंगारी, अर्णव आशिष तागडे, अवनी शेषकर, जिज्ञासा हलमारे, अक्षिता सिंग तसेच ब गटात पहिला पुरस्कार केंद्रीय विद्यालय वायुसेना नगरची विद्यार्थिनी तनिशा परीडा, रिचा सुमन, अनन्या पटेल, तसेच प्रोत्साहान समीरा तबस्सुम, दीक्षा मिश्रा, अतिश्री शेंडे, कीर्ती यादव, तर स्वामी अवदेशानंद शाळेची विद्यार्थिनी अपूर्वा नामदेव भदे हीला सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महालेखाकार अधिकारी दत्तप्रसाद सिरसाट, दिनेश माटे, अक्षय खंडारे, जे.डी.गुप्ता, मेघना जैन, कल्याण अधिकारी सारिका पाटील, कल्याण सहायक मोहम्मद सलीम, सहायक लेखा अधिकारी रवींद्र बागडी व कर्मचारी मोठ्या संख्येने होते.