राजहंस सभागृहात जिल्हास्तरीय छायाचित्र प्रदर्शन

    दिनांक :29-Nov-2024
Total Views |
- डाक विभागाच्या वतीने चित्रकला व प्रश्नमंजुषा स्पर्धा
 
नागपूर,
Postal Department: Painting and Quiz Competition भारतातील थोर व्यक्तिमत्त्वे, ठिकाणे, पोशाख, महत्त्वाच्या इमारती भारतीय संस्कृतीची ओळख सांगणार्‍या गोष्टींवर आधारित अनेक टपाल तिकिटे ठेवण्यात आली आहे.
 
 
post-1
 
टपाल विभागाने आतापर्यंत प्रसिद्ध केलेली टपाल तिकीटांचा संग्रह प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण असल्याची माहिती टपाल विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळे यांनी दिली. भारतीय पोस्ट विभागाच्या वतीने सिव्हिल लाइन्स येथील जीपीओच्या राजहंस सभागृहात जिल्हास्तरीय छायाचित्र प्रदर्शनीच्या उद्घाटनानंतर त्या बोलत होत्या. Postal Department: Painting and Quiz Competition पोस्टाची तिकिटे पाहिल्यावर शाळेतील मुलांना तिकीटांचा संग्रह किंवा आपला देखील फोटो तिकीटांवर असावा, असे वाटत असते.
 
 
post-2
 
आतापर्यंत मोठे राजकीय नेते, महापुरुष तसेच महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या प्रसिध्द लोकांचे फोटो टपाल तिकिटावर छापण्याची प्रथा होती. मात्र आता सर्वच नागरिकांना स्वत:चा फोटोही टपाल तिकिटावर छापता येतो. तसेच कुटुंबीयांचा फोटो किंवा लग्नाच्या निमित्ताने पती-पत्नींचा फोटो तिकिटावर छापू शकतात. यासाठी काही शुल्क ठेवण्यात आल्याची माहिती शोभा मधाळे यांनी दिली. दोन दिवसीय जिल्हास्तरीय छायाचित्र प्रदर्शनीत अनेकांनी टपाल तिकीटांचा संग्रह ठेवला आहे. ही प्रदर्शनी शनिवारी सुरु राहणार आहे. एक पाऊल स्वच्छतेकडे या थीमवर आधारित पोस्ट विभागाने जिल्हास्तरीय छायाचित्र प्रदर्शनीसोबतच चित्रकला स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.