travel destinations झारखंड हे एक अतिशय आकर्षक ठिकाण आहे. जिथे तुम्ही भेट देण्याचा विचार करू शकता. विशेषत: ज्यांना हिरवीगार ठिकाणे आवडतात ते येथे जाण्याचा विचार करू शकतात. झारखंडमधील काही प्रमुख पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेऊया.झारखंड हे एक अतिशय सुंदर राज्य आहे. येथे भेट देण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. येथे आपण कुटुंब किंवा मित्रांसह भेट देण्याचा प्लान करू शकता. जर तुम्हाला गर्दीपासून दूर असलेल्या ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही झारखंडला जाण्याचा प्लॅन करू शकता. येथील घनदाट जंगले व नैसर्गिक सौंदर्य तुमच्या मनाला भुरळ घालू शकते. आज तुम्हाला झारखंडमधील काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. तुम्हीही झारखंडला जात असाल तर, तुम्ही ही ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
जमशेदपूर
जमशेदपूर हे travel destinations झारखंडमधील एक उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही टाटा स्टील झूलॉजिकल पार्क, ज्युबिली पार्क, दिमना तलाव, दलमा वन्यजीव अभयारण्य, हुडको तलाव, भाटिया पार्क, जयंती सरोवर व ज्युबली तलाव अशा अनेक ठिकाणी भेट देऊ शकता. तुम्ही, तुमच्या मुलांसोबत इथे फिरायला जाऊ शकता.
रांची
झारखंडची travel destinations राजधानी रांचीमध्ये पाहण्यासारखी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. येथे तुम्ही रांची तलाव, रॉक गार्डन, कानके डॅम, टागोर हिल, नक्षत्र वन, दशम फॉल्स, जोन्हा फॉल्स, पत्रातु व्हॅली, हुंद्रू फॉल्स, बिरसा प्राणी उद्यान व पंचघग फॉल्स अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. येथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शांततेत वेळ घालवायला मिळेल.
देवघर
भगवान travel destinations शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर देवघरात आहे. जर तुम्ही देवघरला जात असाल तर तुम्ही बाबा बैद्यनाथ धाम मंदिराला भेट देऊ शकता. गंगाजल अर्पण करण्यासाठी लाखो भाविक श्रावण काळात येथे येतात. येथून सुमारे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या नौलखा मंदिराला भेट देण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. तुम्ही नंदन पहाड हे देखील येथील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. याशिवाय, देवघरमधील तपोवन लेणी व टेकड्या तुम्ही पाहू शकता.
हजारीबाग
निसर्गाच्या travel destinations सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर हजारीबागला जाता येईल. हे ठिकाण रांचीपासून ९५ किलोमीटर अंतरावर आहे. हजारीबाग तलाव, कॅनरी हिल, हजारीबाग वन्यजीव अभयारण्य, चमेली धबधबा व पद्मा किल्ला अशा अनेक ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. याशिवाय, हजारीबागपासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर कहप्रियामा गावात नरसिंहाचे मंदिर आहे. येथे तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता.