बुलढाणा,
Buldhana-Shruti Maloo-IRMS बुलढाणा येथील श्रृती मालू हीचे युपीएससी मार्फत आयआरएमएस पदी निवड झाली आहे. काल रात्री युपीएसीचा आयआरएमएस (इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्विस) चा निकाल लागला. यामध्ये तिची निवड झाली आहे. बुलढाणा येथिल रामनगर भागातील राजेंद्र मालू यांची मुलगी आहे. Buldhana-Shruti Maloo-IRMS तिचे प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ हायस्कूल बुलढाणा येथे झाले. बारावी पर्यंतचे शिक्षण भारत विद्यालय बुलढाणा येथे झाले. श्रृती मालू ही २०२१ ला फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी झाल्यानंतर तिने आभ्यासाला सुरूवात केली होती.

पदवी झाल्यानंतर दिल्ली येथे तिने युपीएससीची तयारी सुरू केली होती. Buldhana-Shruti Maloo-IRMS या आधी पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत गेली परंतू तिला अपयश आले. परंतू अपयशाने खचून न जाता. तिने प्रयत्न चालू ठेवले. आपले ध्येय पूर्ण केले. युपीएससी कठीण नाही, सातत्याच्या जोरावर यश मिळू शकते. मी सामान्य कुटूंबातून येत असतांना सुध्दा हे साध्य केले. त्यामुळे तुम्ही सुध्दा हे करू शकता असे आवाहन तिने केले आहे. Buldhana-Shruti Maloo-IRMS तिच्या या यशाबद्दल विविध स्तरातून तिचे कौतुक होत आहे. श्रृती मालू ही आपल्या यशाचे श्रेय आई वडील व गुरूजनांना देते.