डॉ. वैशाली व्यवहारे इएसआयसी रुग्णालयाच्या अधीक्षक

    दिनांक :07-Nov-2024
Total Views |
-रक्तपेढी उभारणार

नागपूर, 
राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयाच्या नव्या वैद्यकीय अधीक्षक म्हणून Dr. Vaishali Vyawahare डॉ. वैशाली मकरंद व्यवहारे यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली. डॉ. मीना देशमुख या सेवानिवृत झाल्या. औरंगाबाद मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झाल्यानंंतर डॉ. वैशाली व्यवहारे यांनी ‘डिप्लोमा इन चाईल्ड हेल्थ' अभ्यासक्रम पूर्ण केला. २४ वर्षांपासून त्या राज्य कामगार विमा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी (गट अ) म्हणून कार्यरत होत्या.
 
 
Dr. Vaishali
 
रुग्णहिताच्या दृष्टीने आवश्यक सोयी उपलब्ध करून रुग्णसेवेला बळकटी देण्याचा प्रयत्न राहील, असे डॉ. व्यवहारे म्हणाल्या. मुळात आधीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांच्या काळात अनेक कामे झाली. २८ वर्षांच्या शासकीय सेवेपैकी विमा रुग्णालयात ९वर्षे त्या वैद्यकीय अधीक्षक होत्या. नागपुरातील मेडिकलच्या माजी विद्यार्थिनी असून बालरोग तज्ञ आहेत. जळगाव, नाशिक, नागपूर येथेही त्यांनी सेवा केली.
 
 
कर्मचाऱ्यांची कमतरता, साधने, उपकरणे व प्रलंबित बिले, औषधांचा तुटवडा, सुपर स्पेशालिटी सेवांची अनुपलब्धता होती. नागपूर रुग्णालयाचे कामकाज सुरळीत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अनेक उपकरणे खरेदी करून रुग्णालय प्रशासनात बरेच बदल केले. ओपीडीची संख्या १ हजारपेक्षा जास्त झाली. राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विमेधारकांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाही सुरू केल्या. त्यांच्या अथक परिश्रमामुळे अनेक कॅन्सर रूग्णांना नियमितपणे वेळेत उपचार प्राप्त मिळत आहेत. सामाजिक संस्थांकडून अनेक पुरस्कार मिळाले असून प्रशासकीय कामगिरीबद्दल तात्कालीन आरोग्यमंत्र्यांकडून सत्कार केला गेला आहे.
 
 
Dr. Vaishali Vyawahare डॉ. व्यवहारे पुढे म्हणाल्या, राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) नुकतीच परीक्षा होऊन मुलाखती झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयातील रिक्तपदे लवकरच भरली जातील. याचा फायदा रुग्णसेवेत होईल. असे असले तरी अनेक आव्हाने आहेत. मुख्य म्हणजे रक्तपेढी सुरू करायची आहे. आणखी एक रुग्णवाहिका घ्यायची आहे.