राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत मद्याचा साठा जप्त

08 Nov 2024 21:04:04
- ३७ लाख ७१ हजार रूपयांचा मुद्देमाल
 
नागपूर,
State Excise Department : विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत तब्बल ३७ लाख हजार २०० रुपयांचा विदेशी स्कॉच मद्याचा साठा जप्त करण्यात आला. उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. सिताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत धरमपेठ मुलीच्या शाळेजवळील निलय अशोक गडेकर यांच्या घरासमोर असलेल्या वाहनामधून हा साठा जप्त करण्यात आला.वाहन क्रमांक एमएच ४६ बी.के. ६४९२ टोयाटो फॉरर्चून या गाडीची झडती असता त्यात विदेशी मद्य साठयात रेडलेबल, ब्लॅकलेबल, जेबसन, बॅलेंटाईन असे ७१ सिलबंद बॉटल्स जमा करण्यात आल्या.
 

utpadan-shulka 
 
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, राज्य उत्पादन शुल्क संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपआयुक्त चासकर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सुरजकुमार रामोड यांचे ही कारवाई करण्यात आली. वाहनासह जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ३७ लाख ७१ हजार २०० एवढी आहे. सदर गुन्ह्यात वाहनाचा चालक व मालक निलय अशोक गडेकर यास अटक करुन अमित किशोर बोबडे या इमास फरार घोषित करण्यात आले आहे.याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
 
State Excise Department : ही कारवाई निरीक्षक मंगेश कावळे, अजमिरे, निरीक्षक शितल बेदरकर तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक विनोंदसिंग ठाकुर, राहुल पवार, धवल तिजारे, अंकुश भोकरे, सोनम शिंगणे आदींनी परिश्रम घेतले. गुन्हयाचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक उमेश शिरनाते करीत असून फिर्यादी प्रशांत धावले आहेत. या कारवाईत उप अधीक्षक अतुल कोठलवार, निरीक्षक मोहन पाटील, आनंद पचार, जितेंद्र पवार, चाळणीवार, दुय्यम निरीक्षक श्यामली कुरडकर, सुनयना वाघमारे, अमित क्षीरसागर, सुरज सहारे, अरशिल मिर्झा, विनोद डुमरे आदींनी कारवाईत भाग घेतला.
Powered By Sangraha 9.0