नागपूर-कोराडी पायदळ दिंडी यात्रा

    दिनांक :09-Nov-2024
Total Views |
नागपूर,
Nirmal Nagri, Umred Road शहरातील सर्व श्री गजानन महाराज भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा संत गजानन महाराज यांची पायी दिंडी यात्रा रविवार दि. १० नोव्हेंबरला श्री संत गजानन महाराज मंदीर, निर्मल नगरी, उमरेड रोड, नागपूर येथून सकाळी ६.०० वाजता निघेल. महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर कोराडी येथे जाणार आहे. या करिता सर्व भक्तांना विनंती करण्यात येते की, दिंडी यात्रेत सहभागी होवून “श्रीं” चा कृपाप्रसाद प्राप्त करावा. सर्व श्री भक्तांकरिता दुपारी २.०० वाजेपासून महालक्ष्मी जगदंबा मातेच्या मंदिरात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. श्री भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे.
 
palkhi 
 
   
दिंडी यात्रेचा मार्ग असा राहील Nirmal Nagri, Umred Road -निर्मल नगरी, उमरेड रोड - सक्करदरा चौक –बसस्टॅन्ड – कॉटन मार्केट -चौक –लोहापुल –गणेश टेकडी - एन.आय.टी.चौक -सदर रेसीडेन्सी रोड -छावनी – पागलखाना चौक –मानकापूर - झिंगाबाई टाकळी -महादुला - कोराडी.या दिंडीत सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे . 
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र