Dattatreya jayanti 2024 भगवान दत्तात्रेय हे त्रिमूर्तीचा एक भाग मानले जातात. दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी व्रत आणि उपासना केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे मानले जाते. या वर्षी दत्तात्रेय जयंती केव्हा साजरी केली जाईल आणि या दिवसाचे महत्त्व काय ? हे आपण जाणून घेऊया.
हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान दत्तात्रेयांची जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा एक भाग मानला जातो. या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला, अशी धार्मिक धारणा आहे, दत्तात्रेयात देव व गुरु ही दोन्ही रूपे आहेत. त्यामुळे, त्यांना श्री गुरुदेवदत्त असेही म्हणतात. श्रीमद भागवत ग्रंथानुसार, दत्तात्रेयजींनी २४ गुरूंकडून शिक्षण घेतले होते. शास्त्रानुसार, या दिवशी उपासना आणि व्रत पाळल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
दत्तात्रेय जयंती कधी असते?
वैदिक Dattatreya jayanti 2024 कॅलेंडरनुसार, मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा १४ डिसेंबर रोजी दुपारी ४:५८ वाजता सुरू होईल. जे १५ डिसेंबर रोजी दुपारी २:३१ वाजता संपेल. त्यामुळे, १४ डिसेंबर रोजी दत्तात्रेय जयंती साजरी केली जाणार आहे.
दत्तात्रेय जयंतीचे महत्त्व
शास्त्रानुसार, Dattatreya jayanti 2024 भगवान दत्तात्रेयांची तीन मुखे आहेत. त्यांचे वडील महर्षि अत्री आणि आईचे नाव अनुसूया होते त्यांना तीन हात आणि तीन तोंडे आहेत. भगवान दत्तात्रेयांची उपासना केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. भगवान दत्तात्रेयांनी निसर्ग, मानव, प्राणी आणि पक्षी यांच्यासह चोवीस गुरुंची निर्मिती केली होती. असे मानले जाते की, त्यांच्या जन्मदिवसाला त्यांची पूजा करून व्रत ठेवल्यास लवकर फळ मिळते व भक्तांना संकटांपासून मुक्ती मिळते. शिवाय, त्यांना संपत्ती आणि समृद्धी देखील मिळते. दत्तात्रेय हे योग व प्राणायामचे प्रवर्तक होते असे म्हणतात. त्यांच्या विचारानेच वायुयानाची उत्पत्ती झाली.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या Dattatreya jayanti 2024 दिवशी गुरू दत्तात्रेयाने नरसिंहाचे रूप घेऊन हिरण्यकशिपूचा वध केला असे मानले जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला धूप आणि दिवा दाखवून नेवैद्य अर्पण करा. असे मानले जाते की, या दिवशी भगवान दत्तात्रेय गंगेत स्नान करण्यासाठी येतात. म्हणून गंगामैयाच्या तीरावर दत्त पादुका देखील पूजली जातात. या दिवशी दत्तात्रेयांची गुरु म्हणून उपासना केल्यास विशेष फल प्राप्त होते.