मंगरुळनाथ,
MLA Shyam Khode : नगरातील नवनिर्वाचीत आमदार श्याम खोडे यांच्या विजयाबद्दल आभार प्रदर्शन रॅली महात्मा फुले चौकातील हिंदुवादी कार्यकर्ते मुकेश सुकाडिया व केतन सुकाडिया यांचे निवास स्थानापासुन बायपास रस्त्ता ते छत्रपती शिवाजी महाराज चौक,संत बिरबलनथ महाराज चौक,सुभाष चौक,राजस्थानी चौक,वीर भगत सिंग चौक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गाने, निघाली. दोन निवडणुकीत उमेदवारीची हुलकावणी मिळाल्यानंतरही त्यांनी पक्षनिष्ठा ढळू न देता सतत पक्षाचे काम केले. मंगळनाथ शहर व तालुक्यामध्ये पक्ष संघटनेसाठी काम करीत राहिले. त्यामुळे त्यांच्या तपश्चर्येला फळ मिळाले असून, एक भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आमदार झाल्याची भावना जनमानसात दिसून येत आहे. खोडे विजयी झाल्यानंतर त्यांची मंगरुळनाथ शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

महात्मा फुले चौकात व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लाडुतुला करण्यात आली. जय महाराष्ट्र चौक, संत श्री बिरबलनाथ महाराज चौक, विर भगतसिंग चौक व इतर ठिकाणी आमदार श्याम खोडे यांचा स्वागत सत्कार केला. शहरामधील या विजय रॅली मध्ये महायुती भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपाई व मित्र पक्षांचे नेते, कार्यकर्ते, सदस्य, मित्र मंडळ, नागरिक आदी होते. MLA Shyam Khode या विजय रॅलीमध्ये आमदार शाम खोडे यांच्यासह राजू पाटील राजे, जिप अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, अशोक हेडा, सुरेश लुंगे, पुरुषोत्तम चितलांगे, सुनील मालपाणी, वीरेंद्रसिंह ठाकूर,सतीश हिवरकर, डॉ. दिलीप रत्नपारखी, अनिल गावंडे, विनोद जाधव, उमेश गावंडे, दिलीपसिंह ठाकुर, मुकेश शिंदे, सचिन पवार, अभिषेक दंडे, यांच्यासह कार्यकर्ते नागरिक आदी उपस्थित होते.