महालॅब्स उपक्रमातून रक्तचाचण्या

    दिनांक :01-Dec-2024
Total Views |
- नंददीप येथे २७ प्रकारच्या तपासणी नि:शुल्क
- तालुका अधिकार्‍यांचा पुढाकार

यवतमाळ, 
Mahalabs Blood Tests शासनाच्या नि:शुल्क प्रयोगशाळा चाचणी निदान योजनेतून शनिवारी समर्थवाडी येथील ‘नंददीप’च्या प्रभूजींची शारीरिक तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्ताच्या २७ प्रकारच्या चाचण्यांचा समावेश आहे. यासाठी तालुका आरोग्य महालॅब्सच्या चमूने पुढाकार घेतला. नगर परिषदेच्या दीनदयाल अंत्योदय शहरी बेघर निवारा केंद्रातून नंददीप फाउंडेशनची मनोरुग्ण सेवा सुरू आहे. येथील भरती मनोरुग्ण तसेच निराश्रितांची शारीरिक स्थिती जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यांच्या शरीरात नकळत निपजल्या जाणार्‍या आजाराला वेळीच रोखता यावे, यासाठी शासनाचा महालॅब्स हा उपक्रम फायदेशीर ठरतो आहे. ३० नोव्हेंबरला जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतीकुमार नवांदीकर यांच्या पुढाकाराने नंददीप बेघर मनोरुग्ण केंद्रात हा उपक्रम पार पडला. यावेळी केंद्रातील १२७ मनोरुग्ण तसेच निराश्रितांच्या रक्तसंबंधीच्या चाचण्या करण्यात आल्या.
 
 
Mahaleb
 
Mahalabs Blood Tests यामध्ये मधुमेह, थायराईड, हिमोग्लोबिन, हिवताप, डेंग्यू, सिकलसेल, एचआयव्ही, पांढर्‍या रक्तपेशी यासारख्या महत्वाच्या चाचण्यांचा समावेश आहे.या उपक्रमासाठी महालॅब्सचे समन्वयक मयूर आरोग्य निरीक्षक संदीप कुटे, भावेश कीर्तने, रमेश देशमुख, शासकीय रुग्णालयातील एचआयव्ही विभागाचे अजय राठोड, सिकलसेल विभागाचे समन्वयक भारत शर्मा, परीक्षण केंद्राच्या मच्छगंधा श्रीराम, स्वराज खडसे, रिया जामुनकर, लोकेश जोगळे, परिचारिका समीक्षा उमरे, दीक्षा मुनेश्वर, मोनाली कांबळे, ऋतिका सोनटक्के, रत्नोदय रामटेके, आशासेवक पूजा चिंचोळकर तसेच नंददीपचे मार्गदर्शक नरेंद्र पवार, संचालक शिंदे, भोजराज गजबे, परिचारिका किशोरी मेश्राम, कांचन केळकर, नेहा डेबूर यांनी सहकार्य केले.या केंद्रावर केवळ बेघरांना आश्रय दिला जातो. मानसिक अस्थिरतेतून भटकंती करणार्‍या या मंडळींकडून स्वतःची शारीरिक तपासणी करण्याची कुठलीच शक्यता नसते. परंतु, ‘नंददीप’मुळे त्यांच्या शारीरिक व्याधींना वेळीच रोखून त्या दृष्टीने पुढील उपचारही केल्या जात आहेत.