विश्लेषण
लेफ्टनंट जनरल एम. के. दास (सेवानिवृत्त)
Bangladesh liberation struggle : स्वातंत्र्याच्या वेळी भारताला तीन आघाड्यांचा सामना करावा लागला हे अनेकांना माहीत नसेल. भारताच्या फाळणीनंतर, भारत आणि पाकिस्तान ऑगस्ट १९४७ मध्ये स्वतंत्र राष्ट्र बनले. एक राष्ट्र म्हणून पाकिस्तान दोन भागात वसला होता. पश्चिम पाकिस्तान ज्याला आपण आज आपण पाकिस्तान म्हणून ओळखतो आणि पूर्व पाकिस्तान, जो बांगलादेश म्हणून जगाच्या नकाशावर आहे. अर्थात, आपला उत्तर शेजारी चीन होता, जो १९६२ च्या युद्धापासून आपला लष्करी शत्रू आहे. यामुळे थोडक्यात सांगायचे झाल्यास त्या काळातही भारताने पश्चिम, उत्तर आणि पूर्व अशा तीन आघाड्यांवर प्रतिकूल लष्करी परिस्थितीचा सामना केला आहे.
समकालीन इतिहासात एखादे राष्ट्र दोन भागात विभागले गेले असे दुसरे नाही. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान हे एकमेकांपासून २२०० किलोमीटर अंतरावर होते आणि भारताचे दोन मुस्लिम बहुसंख्य क्षेत्रांमध्ये सँडविच झाले होते. पूर्व पाकिस्तानवर पश्चिम पाकिस्तानचे वर्चस्व असलेले सैन्य क्रूरपणे राज्य करीत होते आणि ढाका येथील मुख्यालयासह एकूण संपूर्ण सुरक्षा ढाक्यात आपल्या मुख्यालयासह इस्टर्न कमांडच्या जबाबदारीखाली होती. पूर्व पाकिस्तानात बंगाली प्रतिनिधित्व ५ टक्क्यांपेक्षा कमी होते आणि ते देखील बहुतांश तांत्रिक आणि प्रशासकीय पदांवर होते. त्यामुळे संपूर्ण कमांड आणि नियंत्रण संरचना (कंट्रोल स्ट्रक्चर) पश्चिम पाकिस्तानातून निवडण्यात आलेल्या ऑफिसर कॅडरच्या हातात होते. मला खात्री आहे की बांगलादेशात अजूनही असे मुस्लिम मोेठ्या संख्येत आहेत ज्यांनी पाकिस्तानी लष्कराचे अत्याचार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहेत, आहेत आणि धार्मिक छळ म्हणजे नेमके काय हे ते उत्तमपणे जाणून आहेत.
Bangladesh liberation struggle : बांगलादेशला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांनी केले होते. त्यांना वंगबंधू म्हणूनही ओळखले जाते. शेख मुजीबुर रहमान बांगलादेशचे संस्थापक नेते होते. पूर्व पाकिस्तानातील बंगाली लोकांना मोठ्या प्रमाणात भीषण अत्याचारांचा सामना करावा लागला. असे मानले जाते बांगलादेशच्या स्वातंत्र्यापूर्वी नरसंहाराचा परिणाम म्हणून ३० लाख लोक मारले गेले. १९७१ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तत्कालीन लष्करप्रमुखांना मे १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये हस्तक्षेप करण्यास सांगितले तेव्हा सॅम माणेकशॉ यांनी त्या वेळी लष्करी कारवाई न करण्याचा सल्ला इंदिराजींना दिला. आपल्या या निर्णयावर सॅम माणेकशॉ ठाम होते आणि त्यांनी इंदिरा डिसेंबर १९७१ मध्ये कारवाई करण्याचा सल्ला दिला. ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर १९७१ या कालावधीत भारतीय सशस्त्र सेना, विशेषत: भारतीय लष्कराने पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तानविरुद्ध लढा दिला. बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर पूर्व पाकिस्तानमध्ये ९१,००० पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करली. यात पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल एएके नियाझी नेतृत्वाखालील अधिकार्यांचाही समावेश होता. लष्करी इतिहासात भारतीय सशस्त्र दलांचा अतुलनीय विजय अद्वितीय ठरला आहे. भारतीय सेनादलाच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळेच बांगलादेश नावाच्या स्वतंत्र राष्ट्राचा जन्म झाला.
बांगलादेशात ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना राजवटीची जबरदस्तीने हकालपट्टी केल्यानंतर शेजारील देशात हिंदू अल्पसंख्यकांविरुद्ध केवळ अशांतता आणि हिंसाचार होताना दिसत आहे. बांगलादेशात १.३ कोटींहून हिंदू आहेत आणि लोकसंख्येच्या सुमारे ८ टक्के आहेत. भारताव्यतिरिक्त नेपाळनंतर हिंदूंची सर्वाधिक लोकसंख्या असलेला बांगलादेश हा दुसरा देश आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारने सुरुवातीपासूनच भारतविरोधी भूमिका घेतली आहे. कदाचित भारताने पदच्युत पंतप्रधान शेख हसिनाला आश्रय दिल्याने तेथील सरकार नाराज आहे. बांगलादेशात हिंदूंविरुद्ध सुनियोजित हिंसाचार घडविण्यात येत व त्यांचा विविध प्रकारे छळ सुरू असल्याचे गेल्या दोन महिन्यांमधील घटनाक्रमातून अनुभवास येत आहे. बांगलादेश मुक्ती संग्रामापूर्वी म्हणजे १९७१ पूर्वी देखील तेथील हिंदूंचा आणि बंगाली मुसलमानांचा असाच भयंकर छळ झाला होता. तेव्हा देखील धर्मांध जिहादींच्या क्रूर अत्याचारांना लक्षावधी हिंदू बळी पडले होते. विद्यमान युनूस सरकारच्या राजवटीत हिंदू धार्मिक नेत्यांना करण्यासोबतच शेख हसीना यांच्या जवळच्या समजल्या जाणार्या पत्रकारांनाही अटक करण्यात आली आहे. जमात-ए-इस्लामीसारखे कट्टरवादी घटक आणि मूलतत्त्ववादी संघटनांकडून अंतरिम सरकारला निर्देश देण्यात येत आहे. बेगम खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील बीएनपी सरकारची भारतविरोधी भूमिका अजूनही तशीच आहे. त्या बांगलादेशच्या पंतप्रधान असतानाही त्यांची भारतविरोधीच भूमिका होती. बीएनपीच्या राजवटीत, बांगलादेशने आपल्या मुक्तिसंग्रामातील योगदानाचे सर्व संदर्भ मिटवून टाकले. त्यामुळेच ५ ऑगस्ट रोजी शेख मुजीबूर रहमान यांच्या पुतळ्याची विटंबना बांगलादेशच्या सामूहिक विवेकाला धक्का देणारी ठरली आहे आणि हा कदाचित बांगलादेशात घडणार्या वाईट गोष्टींचा अग्रदूत होता.
Bangladesh liberation struggle : मला २०१५ च्या उत्तरार्धात नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या प्रतिनिधीमंडळाचा एक भाग म्हणून बांगलादेशला भेट देण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. माझ्यावर अहवाल तयार करण्याचे काम सोपवण्यात आले असल्याने या भेटीदरम्यान मी बांगलादेशचा खूप तपशीलवार अभ्यास केला आणि लष्करी आणि सरकारी अधिकार्यांशी अनेकदा संवाद साधला. अवामी लीग पक्षाची पुन्हा सत्ता आली होती आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने तेथील पाठ्यपुस्तकांमध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरवपूर्ण समावेश केला होता. एवढेच नव्हे तर विविध कार्यक्रमांंमध्ये देखील शेख हसीना सरकारकडून बांगलादेश मुक्ती संग्रामातील भारताच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख होत होता. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी झालेल्या भारतीय सशस्त्र दलातील माजी सैनिकांचे शिष्टमंडळ विजय साजरा करण्यासाठी दरवर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करते. सध्याच्या अंतरिम सरकारने बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील भारताच्या योगादानाचे सर्व संदर्भ पुन्हा एकदा खोडून काढले आहेत. सत्ता बांगलादेशी सैन्य खूप शक्तिशाली बनले आहे आणि वस्तुस्थिती ही आहे की तेथील लष्करानेच हिंदुविरोधी हिंसाचारात भाग घेतला आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती पुन्हा १९७१ च्या आधीच्या पूर्वीच्या काळासारखी झाली आहे. १९७१ मध्ये देखील अशीच परिस्थिती होती आणि बांगलादेशात नागरी सरकारपेक्षा लष्कर अधिक सामर्थ्यशाली झाले होते.
Bangladesh liberation struggle :एक मोठा, दिलदार, मदतीला सदैव जाणारा शेजारी या नात्याने भारताने आतापर्यंत बांगलादेशातील परिस्थितीवर अत्यंत सन्माननीय मुत्सद्दी पद्धतीने, संयमित प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अल्पसंख्यक हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आणि हिंदू मंदिरांना तोडफोडीपासून वाचवण्याचे आवाहन भारत सरकारने बांगलादेशातील अंतरिम सरकारला केले आहे. बांगलादेश इस्कॉनचे प्रमुख चिन्मय दास आणि इतरांची अटक खरोखरच चिंताजनक आहे. हिंदूंविरुद्ध अशा प्रकारच्या हिंसाचाराचा उद्देश भारताला प्रतिक्रिया देण्यासाठी बाध्य करणे हाच आहे. अर्थात भारताने संतापून बांगलादेशविरुद्ध प्रतिक्रिया द्यावी, म्हणूनच तेथील हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. आता भारताने मुत्सद्देगिरीची भाषा सोडून आणखी वेगळा विचार केला पाहिजे. बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचाराविरुद्ध भारताने ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण भारतात निदर्शने करावीत असे मला सुचवावेसे यामुळे पूर्व पाकिस्तान मुक्त करून स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीत भारताचे किती महत्त्वाचे योगदान होते हे तेथील म्हणजे बांगलादेशातील वर्तमान पिढीला कळून येईल. भारत दरवर्षी १६ डिसेंबर हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा करतो. या वर्षी याला ‘हिंदूंसोबत एकता’ असेही म्हणण्यात आले पाहिजे. तसेच, बांगलादेश मुक्त करण्यात भारताच्या योगदानाबद्दल संपूर्ण जगाला सोशल मीडियासह प्रत्येक संभाव्य मीडिया अभियान चालवले पाहिजे. सर्व भारतीय दूतावासांनी अन्यायी आणि जुलमी बांगलादेश सरकारच्या विरोधात जागतिक मत तयार करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. अशा प्रकारे, बांगलादेशात पुन्हा एकदा मुक्ती मोहीम सुरू करण्याची वेळ आली आहे. जर अशीच परिस्थिती निर्माण झाली तर भारताकडे शेवटचा उपाय म्हणून लष्करी पर्यायाचा करण्याचे सामर्थ्य आहे. पुन्हा एकदा, लष्करी कारवाईची वेळ आणि स्वरूप हे भारताच्या लष्करी नेतृत्वाच्या विवेकावर सोडले पाहिजे. भारताला पुन्हा एकदा तीन आघाड्यांवर युद्धांसाठी तयार राहावे लागू शकते. भारताच्या लष्करी प्रयत्नांनी आणि आमच्या सेनादलातील जवानांच्या बलिदानाने ज्या बांगलादेशला पाकिस्तानच्या कचाट्यातून मुक्त केले त्यांच्यावर पुन्हा बांगलादेशाशीच लढण्याची वेळ येऊ नये, अशी प्रामाणिकपणे आशा करतो आणि प्रार्थना करतो. भारतासारख्या मैत्रीपूर्ण शेजार्यासोबत बांगलादेशचे शांतिपूर्ण सह-अस्तित्व दोन्ही देशांच्या आणि प्रदेशाच्या परस्पर हिताचे आहे. बांगलादेशच्या नेतृत्वाला हे जितक्या लवकर समजेल तितके चांगले. जय भारत.
(पांचजन्यवरून साभार)