नागपूर,
Gangabai Ghat, Gujrnagar विनोद इंगोले समाजसेवक प्रभाग २ २ परीसरातील गंगाबाई घाट, गुजरनगर येथील गडर लाईन दुरुस्ती बाबत बरेच वर्षापासून समस्या आहे. याबाबत नागरिकांनी समाजसेवक, विनोद इंगोले याच्या नेतुत्वात सहायक आयुक्त राठोड झोन ६ महाल यांना निवेदन दिले.
याप्रसंगी स्वास्थ्य अधिकारी खरे उपअभियंता कोटागडे,कनिष्ठ अभियंता तेलरादे यांच्या उपस्थितित या विषयी चर्चा करण्यात आली. इतवारी, गरूड खांब संतीरोड येथील गडर लाईन गेल्या ६ महिन्यापासून चोक आहे. याबाबत रविंद्र बेलसरे, संजय शेटे, बंट्टी अडवानी यांनी अनेकदा तक्रार केली,समस्या दूर झाली नाही.Gangabai Ghat, Gujrnagar या दोन्ही समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्या. अशी मागणी सहायक आयुक्त यांना नागरिकांनी मागणी केली. या प्रसंगी विनोद इंगोले समाजसेवक, रविंद्र बेलसरे,सिध्दार्थ पाटिल, धम्मपाल पाटील, स्वप्निल गजभीये,ललीत शाहु, साकेत मेश्राम,प्रज्वल सुखदेवे, ज्योसना सोगदेवे, सुरेश पंचबुधे,मंदा पाटील, प्राची धकाते, माधुरी मेश्राम , उमेश पात्रीकर,अश्विन भीवगडे, राजन कुंभारे उपस्थित होते.
सौजन्य:देवाशिष टोकेकर,संपर्क मित्र