लोकमंथन : भारतीयत्वाचा संगम

    दिनांक :11-Dec-2024
Total Views |
संस्कृती
- हितेश शंकर
Lokmanthan लोकमंथनच्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन २२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हस्ते हैदराबाद येथे झाले. २०१६ मध्ये भोपाळ येथून सुरू झालेला हा कार्यक्रम आज खर्‍या अर्थाने ‘लोकांचे’ आचार-विचार, नीतिमत्ता, वर्तन आणि व्यवस्था प्रत्यक्ष व्यवहारात आणणारा कर्मयोग्यांचा एक जिवंत, उत्साही सोहळा बनला आहे. भारतीय संस्कृतीचे औदार्य, समज, परिपक्वता आणि जागतिक परिमाणे अधोरेखित करणारा हा कार्यक्रम आज विविध विषय आणि कला प्रकारांच्या भारतातील सर्वांत प्रमुख सांस्कृतिक व्यासपीठ ठरले आहे.
 
 
Lokmanthan-2
 
Lokmanthan लोकमंथनचा यंदाचा प्रमुख विषय अर्थात संकल्पना (थीम) ‘लोकावलोकनम्’ म्हणजेच सर्वांगीण जागतिक दृष्टिकोन हा आहे. ही संकल्पना म्हणजे स्वदेशी संस्कृती आणि परंपरांवर आधारित समाजांच्या जीवनाचे सखोल विश्लेषण करण्यासाठी उघडणारी खिडकी आहे. पहिल्या लोकमंथनमध्ये भारतीय जनमानसावर असलेल्या वसाहतवदाच्या पगड्यावर मंथन सुरू झाले होते. त्यानंतर आणि गुवाहाटी येथे झालेल्या परिषदांमध्ये या याच विषयावर विस्तारपूर्वक चर्चा झाली होती. स्वदेशी कलांचा गौरव व प्रतिष्ठा पुनर्संचयित करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा पुढाकार आहे. येथे स्वदेशी ज्ञान, परंपरा, कृषी, धातुशास्त्र, आरोग्य आणि हवामान या विषयांवर तार्किक दृष्टिकोनातून विचारमंथत करण्यात आले.
 
 
यंदाच्या लोकमंथनमध्ये या जगाची कल्पना एका ‘घरट्या’च्या स्वरूपात आली. मुस्लिम ब्रदरहुडच्या संकुचित मानसिकतेच्या अगदी विरुद्ध जगात बंधुत्वाची भावना वृद्धिंगत करणार्‍या सह-अस्तित्वाचे एक अंगण म्हणजे जणू हे घरटे होते. या कार्यक्रमात आर्मेनिया, इंडोनेशिया आणि इतर देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींनी विविध रंगी उधळण केली. नेहमीचे पारंपरिक आणि औपचारिक मार्ग बाजूला सारून नवीन संकल्पना राबविण्यात आली. याला आम्ही समाजाचे सांस्कृतिक उड्डाण, असे म्हणू शकतो.
 

Lokmanthan-1 
 
Lokmanthan लक्षात ठेवा, हे उड्डाण, ही भरारी साधीसुधी नाही. आळस संपूर्णपणे झटकून टाकून आपल्या वाट्याला आलेली कर्मे कर्तव्यभावनेने करण्यासाठी सिद्ध होण्याची ही तयारी आहे. लोकमंथन हे भारतीय समाजाच्या याच सिद्धतेचे, सर्वांगीण सक्रियतेचे, तत्परतेचे नाव आहे. भारतीय समाज आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडून राहून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रयत्नांची करीत आहे. विशेष गोष्ट ही आहे की शतकांपासून भारतावर होणारी आक्रमणे, वसाहतवादी सत्तेच्या बेड्या आणि त्यानंतर वैचारिक हल्ल्यांमुळे तो हतबल झालेला नाही किंवा दुर्बळही झालेला नाही. भाग्यनगरमध्ये झालेल्या तीन दिवसीय लोकमंथन कार्यक्रमात भारतीय लोकांचा तोच भाव, तेच चैतन्य आणि भविष्याची तयारी दिसून आली.
 
 
तसे पाहता, लोकमंथनसारख्या आयोजनाकडे भारतातील सांस्कृतिक आणि सांस्कृतिक संघर्ष या परिमाणातूनही देखील पाहिले पाहिजे. भारत, ज्याची ओळखच त्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, गहन अध्यात्म आणि मजबूत कुटुंब पद्धतीशी जोडलेली आहे, २० व्या शतकात एक वैचारिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हे आव्हान पश्चिमेकडून आयात केलेल्या सांस्कृतिक मार्क्सवादाचे होते. या विचारसरणीने समाजाच्या पारंपरिक संरचनांना तोडून नवीन सामाजिक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याचा प्रभाव केवळ तात्त्विक, अ‍ॅकॅडमिक जगापर्यंतच मर्यादित नव्हता तर आमची कुटुंबव्यवस्था, धर्म आणि सांस्कृतिक परंपरांवर देखील याचा प्रभाव पडला.
 
 
Lokmanthan सांस्कृतिक मार्क्सवाद मुळात पाश्चात्त्य विचारवंत, विशेषत: अँटोनियो ग्राम्सी आणि हर्बर्ट माकुसा यांच्या विचारांनी प्रेरित होता. ग्राम्सी याने लिहिले की, समाज परिवर्तन करण्यासाठी त्याचा सांस्कृतिक पाया कमकुवत आवश्यक आहे. भारतात या विचारांचा प्रचार विद्यापीठे, माध्यमे आणि राजकारणात खोलवर शिरकाव केलेल्या तथाकथित इतिहासकार आणि बुद्धिजीवींच्या माध्यमातून करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षण आणि शैक्षणिक क्षेत्रात या विचारसरणीने स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली. शाळा आणि विद्यापीठांमध्ये भारतीय परंपरांना ‘जुन्या’ आणि ‘ऑर्थोडॉक्स’ (सनातनी, परंपरानिष्ठ) म्हणून सादर केले गेले. भारताचा इतिहास करून लिहिला गेला, ज्यामध्ये हिंदू धर्म आणि त्याचे योगदान मर्यादित स्वरूपात दर्शविण्यात आले. याउलट विदेशी विचार अर्थात पाश्चात्त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांची जीवनशैली म्हणजे ‘आधुनिकता’ आणि ‘प्रगतिशीलतेची’ प्रतीके म्हणून प्रस्थापित झाली. यामागे दुसरे काही नसून हिंदुत्व आणि कुटुंबव्यवस्थेला लक्ष्य करण्याची रणनीती होती. त्यामुळे नैतिकता आणि सामूहिकतेवर आधारित असलेली हिंदुस्थानची पारंपरिक सांस्कृतिक मार्क्सवादाचे मुख्य लक्ष्य बनली. याची रणनीती सरळ, सोपी होती आणि ती म्हणजे हिंदू समाजाला एकत्र व एकात्म ठेवणार्‍या मूल्यांवर मानसिक, भौतिक, वैचारिक हल्ले करणे. भारताची कुटुंबव्यवस्था, कौटुंबिक संरचना उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय कुटुंबांचे वर्णन पितृसत्ताक जाचक, अत्याचारी असे केले गेले. चित्रपट, साहित्य आणि मीडियात कुटुंबाला, कुटुंब व्यवस्थेला एक ‘अजवड’, रचना म्हणून दाखवण्यात आले, तर पाश्चात्त्य जीवनशैलीला ‘स्वातंत्र्या’चे प्रतीक बनवले गेले. त्याचप्रमाणे भारतीय धर्म आणि आध्यात्मिक परंपरा यांना ‘अंधश्रद्धा’ असे संबोधण्यात आले. धार्मिक विधी, अनुष्ठान आणि सणांचे वर्णन ‘अयोग्य’ आणि ‘आधुनिक काळाला अनुरूप नाही’ असे केले गेले. शिक्षणातून, पाठ्यपुस्तकातून भारतीय संस्कृतीवर नकारात्मक टीका आणि डाव्या विचारसरणीचा प्रसार करण्यात आला. नवीन पिढीच्या मनात आपल्या सांस्कृतिक मुळांविषयी अविश्वास वाढीस लागला आणि विदेशी अर्थात पाश्चात्त्य विचारांचे आकर्षण वाढले.
 
 
Lokmanthan एकंदरीत, सांस्कृतिक मार्क्सवादाने रेसिस्ट (प्रतिकार), रिजेक्ट (अस्वीकार) आणि रिबेल (विद्रोह) अशा ‘३-आर’ ची रणनीती आखली आणि त्याप्रमाणे प्रचार व प्रसार सुरू झाला. मात्र, हा समाजाला त्याच्या संस्कृतीपासून दूर करण्याचा, सांस्कृतिक मुळे नष्ट करण्याचा घातक मार्ग आहे. तरुण पिढीला हे सर्व शिकवण्यासाठी वामपंथी विचारवंतांनी सुनियोजित प्रयत्न केले. पारंपरिक मूल्यांना विरोध म्हणजेच पुरोगामित्त्व हे तरुण पिढीच्या मनात बिंबविण्याचे प्रयत्न हा त्याच रणनीतीचा एक भाग आहे. हळूहळू हा विरोध धार्मिक रीति-रिवाजांपासून कुटुंबाच्या भूमिकेपर्यंत पसरला. त्याच बरोबर पारंपरिक मान्यता, श्रद्धा, प्रथा व परंपरांना पूर्णपणे नाकारण्याचा संदेश आला. यामुळेच भारतीय तरुण त्यांच्या सांस्कृतिक मुळांपासून दूर जात आहेत. याची उदाहरणे म्हणजे वामपंथी प्रेरित अनेक आंदोलनांमध्ये हिंदूंच्या परंपरा किंवा सांस्कृतिक मूल्यांचा जाहीरपणे अपमान करण्यात आला. ही रणनीती केवळ भारतीय समाजासाठीच नव्हे तर त्याच्या नैतिक आणि भावनिक संरचनेसाठीही देखील धोकादायक ठरली. त्यामुळे भारतीय समाजाचा आधार असलेले कुटुंब दुबळे झाले. परिणाम सामाजिक विघटन, नैतिक पतन आणि मानसिक आरोग्य संकट म्हणून समोर आले. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय एकतेवर हल्ला करण्यात आला. परिणामी सांस्कृतिक विभाजनाने जातीय आणि धार्मिक संघर्षांना जन्म दिला. तसेच राष्ट्राविषयी समर्पण, आणि अभिमानाला ‘पुराणमतवादी’ संबोधण्यात आले. सहिष्णुता, विविधता आणि सामूहिकतेचे प्रतीक असलेल्या भारतीय संस्कृतीवर देखील हल्ला झाला. त्यामुळे पिढी आपल्या सांस्कृतिक वारशापासून दूर जात गेली. भारताला आपली सांस्कृतिक ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज आहे. शिक्षण आणि प्रसारमाध्यमांनी संतुलित दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, ज्यातून भारतीय परंपरा आणि मूल्यांचा आदर राखला जाईल. ‘जर आमची संस्कृती नष्ट झाली तर आमचा आत्माही नष्ट होईल’,असे स्वामी विवेकानंद म्हणाले होते. त्यामुळे आपल्या सांस्कृतिक मुळांकडे जाण्याची, आपली संस्कृती समजून घेण्याची आणि ती केवळ जपण्याचीच नाही तर ती अभिमानाने पुढच्यापर्यंत पोहोचवण्याची हीच वेळ आहे. तरच हा वैचारिक संघर्ष आपण जिंकू शकतो, हे समस्त भारतीयांनी ध्यानात घेतले पाहिजे.
कुटुंब व्यवस्था : भारतीय संस्कृतीचा पाया
Lokmanthan : वामपंथी विचारवंत, तथाकथित पुरोगामी साहित्यिक, लेखक भारतीय अर्थात हिंदू कुटुंब व्यवस्थेवर हल्ला चढवतात. वास्तविक कुटुंबव्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये, आपल्या कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या पुढच्या पिढीला, सहज दैनंदिन व्यवहारातून सत्कृत्यांची सवय लावण्याचे कार्य, पिढ्यानुपिढ्या कुटुंब व्यवस्थेतून होत आहे. सत्कृत्यांच्या वारंवारितेने त्यांचे संस्कारात रूपांतर होते. या संस्कारातून कुटुंबातील लहानात लहान आणि मोठ्यात मोठी व्यक्तिसुद्धा नकळत होत असते. अशा संस्कारित होणार्‍या असंख्य सामान्य व्यक्तींचा व्यवहार आपली संस्कृती बनवत आला आहे.
कुटुंबातून सहज होणार्‍या संस्कारांचा विचार करताना अनेक गोष्टी ध्यानात येतात. ‘मी’मधून आम्ही’ आणि ‘अहं’ ‘वयम्’ च्या संस्काराची सुरुवात येथेच होते. आम्ही सर्व एक आहोत; त्यामुळे जबाबदारी सर्वांची असते, आनंदसुद्धा सर्वांनी मिळून घ्यायचा असतो, ही मानसिकता केवळ संवादानेच तयार होते.
एकत्र कुटुंब हे आपले एक वैशिष्ट्य आहे. ३-४ पिढ्या एकत्रितपणे राहणारी असंख्य कुटुंबे आहेत, एकत्र कुटुंबात सामान्यपणे अगदी लहान मुले, महाविद्यालयात जाणारे किशोरवयीन, मध्यम वयाचे आई-वडील आणि वयस्क आजी-आजोबा असतात. अशा कुटुंबामध्ये ‘जनरेशन गॅप’च्या समस्या जाणवतात, त्याला कारणेही आहेत. प्रत्येकाचा दृष्टिकोन त्यांच्या परीने योग्यच असतो, तो दोघांनीही समजून घेतला नाही, तर विसंवादाची होते. घरातील जेष्ठांनी तरुण पिढीला समजावून सांगताना, आमच्या काळी असं नव्हतं ’, अशी वाक्ये न बोलता शब्दश: या पिढीच्या विचारांशी समरस’ व्हावे (दोघांची ‘वेव्ह लेंथ’ जुळावी म्हणजे विसंवाद होणार नाही. अर्थात या प्रक्रियेमधे घरातील ज्येष्ठांची भूमिका महत्त्वाची असते.
(पांचजन्यवरून साभार)