जातीयवाद माेडून झालेली विधानसभा निवडणूक!

    दिनांक :12-Dec-2024
Total Views |
वेध
Assembly elections vedh महाराष्ट्र विधानसभा 2024 ची निवडणूक झाली. निकाल जाहीर झाले. महायुतीला मतदारांनी पुन्हा सत्ता स्थापनेचा प्रचंड जनादेश दिला. 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी झाला. पण, महाविकास आघाडी अजूनही या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या महाधक्क्यातून बाहेर आलेली नाही. आपल्या पराभवाची नेमकी काेणती कारणे आहेत? आपण सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या लाेकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत एवढा माेठा पराभव कसा काय झाला? या प्रश्नाचे उत्तर त्यांना सापडत नाही किंवा ते शाेधण्याचा प्रयत्नच करीत नसावेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आता ईव्हीएमला दाेष देत आहेत.
 
vedg
 
लाेकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपा भटजी शेठजीचा पक्ष आहे. हा पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास आरक्षण संपवेल. देशाची घटना बदलविण्याचा यांचा अजेंडा आहे इत्यादी खाेटे नॅरेटिव्ह माेठ्या प्रमाणात पसरविले हाेते. मराठा-मराठेतर वादाचेही भांडवल केले हाेते. त्याला काटशह देण्यात भाजपा आणि रालाेआ कमी पडले. तसेच, मतदारांनी देखील भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेत येणार आहेच, असा विश्वास बाळगून मतदानापेक्षा आपल्याकडील व आपल्या नातेवाईकांकडील लग्न समारंभ व इतर कामांना अधिक महत्त्व दिले हाेते. Assembly elections vedh त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली हाेती. त्यामुळेही भाजपा आणि रालाेआला लाेकसभेत झटका बसला हाेता. मात्र, या अनुभवातून भाजपा आणि महायुतीने धडा शिकून विधानसभा निवडणुकीत या सर्व चुका सुधारण्यावर भर दिला. लाेकसभेत झालेल्या व्हाेट जिहादला देखील काटशह देण्याची जाेरदार तयारी करण्यात आली. मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याकडे विशेष लक्ष देण्यात आले. त्यानुसार महायुतीतील सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले हाेते. सरकारचा कार्यकाळ संपण्यापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण, शेतक-यांना कृषिपंपाचे वीज देयक माफ करणे, शेतक-यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी देणे, सर्वच जाती धर्मातील नागरिकांना शासकीय याेजनांचा लाभ पाेहाेचविणे, यामुळे महायुती शासनाबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक विचार निर्माण झाला हाेता.
 
तसेच, वर्ष दीड वर्षात मनाेज जरांगेंच्या नेतृत्वात पेटविण्यात आलेले मराठा आरक्षण आंदाेलन निवडणूक काळात थंड करण्यात महायुतीला यश आले. विशेषत: मराठा आरक्षण आंदाेलनामुळे मराठा व मराठेतर हा वाद निर्माण झाला हाेता. मात्र, निवडणूक प्रचारात भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा विरुद्ध ब्राह्मण, मराठा विरुद्ध मराठेतर हा वाद माेडून काढण्यात यश मिळविले. आपण कसे मराठ्यांना आरक्षण दिले Assembly elections vedh व न्यायालयात टिकविले हाेते. मात्र महाविकास आघाडीला न्यायालयात ते कसे टिकविता आले नाही, हे मतदारांना पटवून देण्यात त्यांना यश आले. तसेच, शहरातच नव्हे तर, ग्रामीण भागात सर्व जाती धर्मातील मतदारांना काेणत्या ना काेणत्या शासकीय याेजनेचा लाभ मिळाला आहे. अनेक आमदारांनी बुद्ध विहारांना काेट्यवधींचा निधी दिल्यामुळे आंबेडकरी जनतेच्या मनात असलेला भाजपाविषयीचा गैरसमज दूर झाला हाेता. त्यामुळे कधी नव्हे ते आंबेडकरी जनतेने देखील महायुतीच्या पारड्यात मते टाकल्याचे आता आंबेडकरी जनताच सांगत आहे. त्यामुळे या समाजाची मते महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी, अशा तीन ठिकाणी विभागल्या गेली.
 
त्याचाही फायदा महायुतीला झाला. तर, आमदार गाेपीचंद पडळकर यांनी परवा मारकडवाडी येथील जाहीर सभेत बाेलताना महाविकास आघाडीतील प्रस्थापितांना संपविण्यासाठी आता देवाभाऊ आला आहे. त्यामुळेच आम्हला आज ही पदे आणि आमदरकी मिळाल्याचे ठासून सांगितले. याचा Assembly elections vedh अर्थ या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रातील प्रस्थापितांनी कशाप्रकारे समाजातील कमजाेर घटकातील नेतृत्वाला दाबून ठेवले हाेते, ते लक्षात येते. पण, महायुती आणि देवाभाऊंनी त्या उपेक्षितांना सत्तेची फळे चाखायला दिली. त्याचा परिणाम म्हणून या निवडणुकीत गावगाड्यातील जातिपातीच्या राजकारणाला थारा न देता मतदारांनी विकासाला मतदान केले आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार प्रचंड मताधिक्क्याने स्थापन केले.

विजय कुळकर्णी
8806006149