नागपूर,
JSW-NDFA competition : जेएसडब्लु व नागपूर जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फुटबॉल स्पर्धेत सिनियर डिव्हिजनमध्ये ग्रीन फ्लॅग व इलाईट डिव्हिजनमध्ये यंग मुस्लिम फुटबॉल क्लब विजयी झाला.
पहिल्या सामना अनिर्णीत:
पहिल्या सामना यंग मुस्लिम फुटबॉल क्लब विरुद्ध मॉईल एलेव्हन यांच्यात झाला होता. या चुरशीच्या सामन्यात शरीक नदीमला व्या मिनिटात तर मॉईलच्या संघाकडून अजय मरकाम याला ७१व्या मिनिटात रेफरीने धोक्याचे कार्ड दाखविले. तरी सामन्यासंपेपर्यंत एकही गोल होऊ न शकल्याने हा सामना अनिर्णीत राहिला.
दुसर्या सामन्यात ग्रीन फ्लॅग विजयी:
याच मैदानावर झालेल्या दुसर्या सामन्यात ग्रीन फ्लॅग विरुद्ध ओएनएफसीत झालेल्या सामन्यात ग्रीन फ्लॅगने २ गोल करीत विजय मिळविला. ग्रीन कफील अहमद याने १०व्या मिनिटात व नईम याने २१व्या मिनिटात गोल केला. ओएनएफसीच्या संघ भोपळा फोडण्यास असमर्थ ठरला.