नागपूर,
Kashish Bhagat : शहरातील महात्मा गांधी इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थी खेळाडू कशिश भगत हिने चौथ्या दिवशी 18 वर्षांखालील मुलींच्या संघाच्या 1000 मीटर मिडले शर्यतीत कांस्यपदक पटकावले. काल तिने 400 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले.
नुकत्याच कलिंगा स्टेडियम, भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सात खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र संघाने 2.15.58 सेकंद वेळेसह स्पर्धा पूर्ण केली, सुवर्णपदक तामिळनाडू संघाने 2.12.80 सेकंदासह आणि रौप्यपदक हरियाणा संघाने 2.13.94 सेकंदासह पूर्ण केले. कशिशला शाळेचे क्रीडा शिक्षक रामचंद्र वाणी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
स्पर्धेदरम्यान भारतीय अॅथ्लेटिक्स महासंघाचे अध्यक्ष अर्जुन पुरस्कार्थी आदिल यांनी महाराष्ट्र रिले संघाच्या खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. कशिश भगतने ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचा विशेष प्रकल्प असलेल्या आंतर जिल्हा राष्ट्रीय कनिष्ठ गट ऍथलेटिक्स स्पर्धेत सलग दोन वर्षे पदके जिंकली आहेत. तिच्या यशाबद्दल जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. सूर्यवंशी यांनी कौतुक केले. गुरुदेव नगराळे, नागेश सहारे (नगरसेवक), डॉ. संजय चौधरी, सभापती उमेश नायडू, शेखर सूर्यवंशी, विबेकानंद सिंह, एस. जे. ऍंथोनी व अर्चना कोट्टेवार, रवींद्र टोंग, राजेश भूते, चंद्रभान कोलते, ब्रिजमोहन सिंघ रावत, कमलेश हिंगे, आशुतोष बावणे, निशांत डेहरिया, शुभम गौरव, पंकज करपे, गणेश वाणी, नितीन धाबेकर आदींनी अभिनंदन केले.