नागपूर,
Kaundanyapur Amravati श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान श्री क्षेत्र कौंडण्यापूरला एकादशीच्या दिवशी , हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत वारकरी संप्रदाय व विठ्ठल रुक्मिणी संस्थानच्या सर्व लॊकांनी बांगला देशातील, आपल्या हिंदू बांधवांवर होत असलेल्या अनन्वित अत्याचाराचा निषेध केला.
यावेळी भारत सरकारला यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची विनंती करण्यात आली.Kaundanyapur Amravati याप्रसंगी ह.भ.प. संजय महाराज ठाकरे ,ह.भ.प. पंकज महाराज महल्ले अध्यक्ष अमालकर ,सचिव सदानंद साधू,विश्वस्त हिंमत टकोने,सुरेश चौहान, ,अशोक पवार,अतुल ठाकरे सरपंच प्रेम राठोड ,मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि असंख्य वारकरी उपस्थित होते.
सौजन्य:देवाशिष टोकेकर,संपर्क मित्र