कारंजा लाड,
Nagpur Sambhajinagar : शहरातील वाढते गुन्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने पोलिस प्रशासनाने शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ९४ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यापैकी ५५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरू करण्यात आले असून, उर्वरीत काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे.
नागपूर संभाजीनगर द्रुतगती मार्गावरील रिलायन्स चौकात ८, झाशी राणी चौकात ५ तर पोहावेश परिसर, पसरणी रोड, जुना सरकारी दवाखाना व महात्मा फुले चौकात प्रत्येकी ४, दाईपुरा परिसर ३, मेडिकल चैकात ३, जयस्तंभ चौकात ५, महावीर ब्रम्हचारी आश्रम परिसरात ३, नागपूर संभाजीनगर द्रुतगती मार्गावरील सावरकर चौकात ७ तर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, दत्त मंदिर परिसर, नगरपरिषद परिसर, Nagpur Sambhajinagar शिक्षक कॉलनी, गुरु मंदिर, विठ्ठल मंदिर, दारव्हा वेश, वीर संभाजी महाराज चैक, बिबीसापुरा, नगीना मज्जिद, गांधी चैक, लिबर्टी चैक, टिळक चैक, सहारा चैक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैक, वाल्मिकी चैक, बस स्थानक, टी पॉइंट व दारव्हा मार्गावरील हिंदू स्मशानभूमी या ठिकाणी प्रत्येकी २ असे एकूण ९४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे.
मागील काही दिवसात शहरात घरफोडीच्या, पॉकेटमारीच्या आणि मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्यात त्यामुळे भुरटे चोर शोधण्यात पोलिसांना अडचण निर्माण होत आहे. तसेच शहरातील विविध घटना व गुन्हेगारी प्रवृत्ती यावर नियंत्रण राहावे या उद्देशाने पोलीस प्रशासनाने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार असून संपूर्ण शहर सीसीटीव्ही कॅमेर्याच्या निगराणीत असणार आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास निश्चितच मदत होणार आहे.