तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Sanjay Rathod : दिग्रसचे आमदार व माजी मंत्री संजय राठाेड यांच्याबाबत काही दिवसांपासून वृत्तवाहिन्यांवरून निराधार बातम्या पसरविल्या जात आहेत. याबाबत आ. राठाेड यांनी प्रथमच मत व्यक्त करीत, ‘आपण काेणत्याही प्रगती पुस्तकात नापास झालेलाे नाही’, असे स्पष्ट केले. माध्यमांनी काेणतीही खातरजमा न करता आपल्या विराेधात सुरू केलेला हा प्रकार थांबवावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
विशेषत: वृत्तवाहिन्यांमध्ये संजय राठाेड यांच्या विराेधात ‘प्रगती पुस्तकात नापास’, ‘मंत्रिमंडळातून पत्ता कट’ आणि ‘संजय राठाेड यांना मंत्रिमंडळातून डच्चू’ अशा बातम्या दाखवल्या जात आहेत. यावर भाष्य करताना आ. संजय राठाेड यांनी हा प्रकार आपल्या जिव्हारी लागला असून, मनाला प्रचंड वेदना हाेत असल्याचे म्हटले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित हाेवून समाजकारणातून आपण राजकारणात आलाे. आपण 1993 पासून शिवसेनेत काम करत असून, शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख आणि नंतर आमदार, राज्यमंत्री आणि मंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
2004 पासून सतत पाचवेळा दिग्रस मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. प्रत्येकवेळी आपले मताधिक्य वाढले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 44 हजार मते आपल्याला मिळाली आहेत. माझ्या कार्यकाळात महसूल, वन, अन्न व औषध प्रशासन आणि जलसंधारण मंत्री म्हणून महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
मतदारसंघ आणि जिल्ह्यासाठी सातत्याने विकासकामे आणि माेठा निधी खेचून आणला आहे. बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पाेहरादेवी येथे जवळपास 700 काेटी रुपयांची विकासकामे केली. पंतप्रधान नरेंद्र माेदी हे ‘बंजारा विरासत’ या भव्य नंगारा संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी आले व त्यांनी माझ्या कामाचे काैतुक केले, असेही आ. राठाेड म्हणाले.
गेल्या अडीच वर्षांत मी पालकमंत्री राहिलेल्या यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात पंतप्रधान दाेनवेळा आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र \डणवीस व अजित पवार हे पाचवेळा यवतमाळ जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना आले आहेत. माझे प्रगतीपुस्तक वाईट असते तर त्यांनी मला भरभरून निधी दिला असता का, माझे काम लाेकाभिमुख नसते तर सलग पाच वेळा जनतेने मला निवडून दिले असते काय, असे प्रश्नही संजय राठाेड यांनी उपस्थित केले आहेत.