वर्धा ब्राह्मण सभेतर्फे राज्यस्तरीय उप-वरवधू परिचय मेळावा

    दिनांक :12-Dec-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा,
वर्धा ब्राह्मण सभा व स्नेहालय sub bride introduction meeting यांच्या संयुक्त वतीने रविवार 5 जानेवारी 2025 रोजी सर्वशाखीय महाराष्ट्रीय ब्राह्मण उप-वरवधू परिचय मेळाव्याचे आयोजन स्थानिक सत्य नारायण बजाज सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याचे ब्राह्मण सभेचे अध्यक्ष विलास कुळकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळवले आहे.
 
 

sub bride meeting 
 
 
महाराष्ट्रातूनच नव्हे तर sub bride introduction meeting आजूबाजूच्या प्रांतातील मराठी भाषिक उप-वरवधूंचा मोठ्या प्रमाणात या मेळाव्यात सहभाग असतो. नोंदणी झालेल्या सर्वांना मेळाव्याचे अनुषंगाने मुला-मुलींच्या रंगीत फोटो व विस्तृत माहितीसह प्रकाशित होणारी प्रथम यादीची छापील प्रतसुद्धा देण्यात येणार आहे तर गुढीपाडव्याच्या मुर्हतावर पुरवणी यादी प्रकाशित होणार असून ही यादी पीडीएफ स्वरुपात पाठविण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी अनेक अनुरुप स्थळांची माहिती उपलब्ध होत असल्याने दरवर्षी या मेळाव्याच्या अनुषंगाने बहुसंख्य विवाह जुळून येतात. मेळाव्याच्या नोंदणीसाठी अथवा आवश्यक माहितीसाठी ब्राह्मण सभा, अध्यक्ष व मेळावा संयोजक विलास कुळकर्णी, जनता चौक, रामनगर, प्रकाश परसोडकर पोद्दार बगीचा शास्त्री चौक वर्धा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.