शेतकर्‍यांनी रब्बी हंगाम पिकविमा योजनेचा लाभ घ्यावा : आ. श्याम खोडे

02 Dec 2024 18:16:42
वाशीम,
Pradhan Mantri Crop Insurance Scheme राज्य शासनाने जून २०२३ पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना सुरू केली आहे. शेतकर्‍यांना खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही केवळ एक रुपया विमा भरून पिक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत गहू, ज्वारी, कांदा व हरभरा यासाठी पिक विमा भरता येणार आहे. शासनाने यावर्षी पासून शेतकर्‍यांना प्रती एक रुपया याप्रमाणे पिक विमा योजनेस सुरूवात केली आहे. शेतकर्‍यांनी पिक विमा चा लाभ घ्यावा, असे आवाहन नवनिर्वाचित आमदार श्याम खोडे यांनी केले आहे.
 
 
khode
 
 
 नैसर्गिक आपत्ती,Pradhan Mantri Crop Insurance Scheme  कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना पिक विमा योजनेअंतर्गत मदत मिळू शकेल. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, त्यामुळे, शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठी पिक विमा काढून घेणे फायद्याचे ठरणार आहे. शेतकर्‍यांनी मुदतीत ऑनलाईन पिक विमा अर्ज भरावा. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे, शेतकर्‍यांची भिस्त आता रब्बी पिकावर आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील पिकांची भरपाई करून घेण्यासाठी पिक विमा भरणे आवश्यक आहे.
शेतकर्‍यांना १ नोव्हेंबर Pradhan Mantri Crop Insurance Scheme ते १५ डिसेंबर या कालावधीत ज्वारी, गहू, हरभरा, कांदा इत्यादी पिकांचा पिक विमा भरता येणार आहे. पिक विमा योजना अधिसूचित पिकासाठी लागू राहणार आहे. रब्बी गहू बागायती, ज्वारी बागायती, हरभरा कांदा ही पिके अधिसूचित करण्यात आली आहे. तरी या योजनेत शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार श्याम खोडे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0