स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या!

02 Dec 2024 20:29:52
तभा वृत्तसेवा
 
 
हिंगणघाट, 
 
 
Wardha-EVM-ballot paper स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका इव्हिएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या या मागणीचे निवेदन उबाठा गटाच्या वतीने उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. विधानसभेच्या या निवडणुकांमध्ये इव्हीएम द्वारे घोळ करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. बर्‍याच ठिकाणी प्रत्यक्षात मतदान व मशीन यामध्ये तफावत दिसून येत आहे. तसेच जनतेला या निकालाबद्दल संशय निर्माण झाला आहे.
 
 
 

Wardha-EVM-ballot paper 
 
 
 
Wardha-EVM-ballot paper बरेचजण याविरुद्ध न्यायालयात सुद्धा गेले. तर काही राजकीय पक्ष या विरोधात आंदोलन करीत आहेत. दरम्यान, हिंगणघाट येथील उबाठा गटाच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्तांना उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत निवेदनातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका इव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्या, अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मधून निघणार्‍या प्रतची मोजणी करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
 
 
 
Wardha-EVM-ballot paper निवेदन उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे, तालुकाप्रमुख सतीश धोबे, मनीष देवढे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी प्रकाश अनासाने, गजानन काटवले, अनंता गलांडे, शंकर मोहम्मारे, फिरोज खान, नईम शेख, नितीन वैद्य, अतिक बेग, प्रशांत सुपारे, प्रशांत कांबळे, नरेश तामगाडगे, विवेक भोयर, आदींची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0