संत गाडगेबाबा यांना विनम्र आदरांजली...!

20 Dec 2024 14:10:45
नागपूर ,  
Sant Gadge Maharaj-- संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव "डेबूजी झिंगराजी जानोरकर" असे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी, परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यासाठी त्यांनी किर्तनाचा मार्ग स्वीकारला.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित आणि दलितांच्या सेवेसाठी वाहून घेतले. त्यांचे किर्तन हा लोकज्ञानाचा एक भाग होता. ते आपल्या कीर्तनातून समाजातील ढोंगीपणा आणि परंपरांवर टीका करत असत. गाडगेबाबांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व सांगून स्वच्छता व चारित्र्य शिक्षण दिले.गाडगे महाराज हे गरीब आणि दलितांमधील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता निर्मूलनाचे कार्य करणारे समाजसुधारक होते. माणसात देव शोधणाऱ्या या संताने ठिकठिकाणी अनाथांसाठी धर्मशाळा, अनाथाश्रम, आश्रमशाळा सुरू केल्या. 
 
BABA  
 
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणा नंतर अवघ्या १४ व्या दिवशी बाबांचं निधन झाले . डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांचे घनिष्ठ संबंध होते.Sant Gadge Maharaगाडगेबाबांनी पंढरपूरची धर्मशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे स्वाधीन केली होती. यांच्या ६८ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
सौजन्य:महादेव तायवाडे,संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0