- प्रवाशांनी व्यक्त केला दिलासा
- ९० दिवसपर्यंत प्लॅटफॉर्म होते बंद
नागपूर,
Ajni station : अजनी रेल्वे स्थानकावर गत तीन महिन्यापासून विविध कामे करण्यात आली आहे. सर्व कामे आता पूर्ण झाल्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ येथून पूर्ववत रेल्वे वाहतूक सुरु झाली असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. अजनी स्थानकावर अप गाड्यांच्या थांब्यांचा तसेच सुरू/समाप्त होणार्या गाड्यांची ये- जा सुरु झाली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने १२ सप्टेंबर २०२४ पासून प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि येथून रेल्वे वाहतूक बंद केली होती. ९० दिवसपर्यंत प्लॅटफॉर्म परिसरात विकास कामे करण्यात आली. दरम्यानच्या काळात प्रवाशांची गैरसोय झाली होती. अजनी रेल्वे स्थानकावरील विविध सुधारणा तसेच नवीन बांधकामासाठी दोन्ही प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद ठेवले होते.
Ajni station ; सुधारित वेळापत्रकानुसार आता अजनी स्थानकावर खालील अप गाड्या थांबण्यास सुरुवात झाली आहे. यात अजनी स्थानकावर गाडयांमध्ये गाडी क्र. ०१३७४ (नागपूर - वर्धा मेमू) अजनी येथे रविवार वगळता दररोज सकाळी ०८.०९ वाजता सुटेल. तसेच गाडी क्र. ११०४० (गोंदिया - कोल्हापूर एक्सप्रेस) अजनी येथे दररोज १०.५४ येईल आणि १०.५५ वाजता सुटेल. गाडी क्र. १८०३० (शालिमार - लोकमान्य टिळक एक्सप्रेस) अजनी येथे दररोज १३.४४ वा. येईल आणि वाजता सुटेल. गाडी क्र. ११४०३ (नागपूर - कोल्हापूर एक्सप्रेस) अजनी येथे मंगळवार आणि शनिवारी १५.२३ वाजता येईल आणि १५.२४ वाजता सुटेल. गाडी क्र. १२१०६ (गोंदिया - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस) अजनी येथे दररोज १७.०९ वाजता येईल आणि १७.१० वाजता सुटेल. गाडी क्र. १२११४ (नागपूर - पुणे एक्सप्रेस) अजनी मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी १८.०८ वाजता येईल आणि १८.०९ वाजता सुटेल. गाडी क्र. १२१३६ (नागपूर - पुणे एक्सप्रेस) अजनी येथे सोमवार, बुधवार आणि शनिवारी १८.०८ वाजता येईल आणि १८.०९ वाजता सुटेल.
Ajni station : गाडी क्र. १२१४० (नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस) अजनी येथे दररोज २१.२३ वाजता येईल आणि २१.२५ सुटेल. तसेच, खालील गाड्या आता अजनी स्थानकावरून ठरलेल्या वेळेत सुटणार आहे. यात प्रामुख्याने गाडी क्र. १२१२० (अजनी - अमरावती एक्सप्रेस) अजनी स्थानकावरून दररोज १८.३० वाजता सुटेल. तसेच गाडी क्र. २२१२४ (अजनी - पुणे एक्सप्रेस) अजनी स्थानकावरून मंगळवारी १९.५० वाजता सुटेल. याशिवाय गाडी क्र. २२१४० (अजनी - पुणे एक्सप्रेस) अजनी रविवारी १९.५० वाजता सुटेल. तसेच, खालील गाड्या आता अजनी स्थानकावर वेळेनुसार समाप्त होणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने गाडी क्र. १२११९ (अमरावती - अजनी एक्सप्रेस) अजनी येथे ०८.१५ वाजता पोहोचेल. तर गाडी क्र. २२१२३ (पुणे - अजनी एक्सप्रेस) अजनी येथे ०४.५० वाजता पोहोचेल. आणि गाडी क्र. (पुणे - अजनी एक्सप्रेस) अजनी येथे १२.५० वाजता पोहोचेल. मुख्यत: प्रवाशांच्या सोयीसाठी आणि अजनी स्थानकावरील गाड्यांच्या ये- जा सुरु झाल्याने प्रवाशांनी दिलासा व्यक्त केला आहे.