झिंगाबाई टाकळी येथे निःशुल्क शिबिर

    दिनांक :22-Dec-2024
Total Views |
नागपूर ,
Zingabai Takli Nagpur सुमित सोसायटी गार्डन झिंगाबाई टाकळी येथे सुख शांती समाधान संस्था नागपूर तर्फे २३ डिसेंबर ते ४ जानेवारी  पर्यंत, रोज सकाळी ६ ते ७ यावेळेत  येथे निःशुल्क शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात आसन, प्राणायाम, ओंकार तसेच विविध आजारानुसार आसन प्रात्यक्षिकासह शिकविल्या जाईल. या शिवाय व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा साधायचा ? सुप्त गुणांना जागृत करून त्याचे प्रगटीकरण कसे करायचे यावर सुद्धा मार्गदर्शन केले जाईल. प्रत्येक शिबिरार्थी हा समाधानी होऊन संस्थेशी जुळून राहतो.
 
yog  
 
 संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगगुरू सचिन माथुरकर यांच्या मार्गदर्शनाने शिबिर संपन्न होत आहे. तेव्हा सर्व योगा प्रेमींनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.Zingabai Takli Nagpur  आपले जीवन आनंदमय सुखमय निरोगी करावे. हि संस्था १९ वर्षांपासून निःशुल्क, निःस्वार्थी, सेवाव्रती होऊन करीत आहे. सुख शांती समाधान संस्थेच्या सचिव शीला केळापूरे यांनी कळविले आहे.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र