सावनेर तालुक्यातील तूर पिकावर थंडीचा कहर

23 Dec 2024 12:22:15
नागपूर,
Savner Taluka : नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुका अंतर्गत येण्याऱ्या मंगसा, खुरजगांव, केळवद, परसोडी, रामपुरी, हेटी, खानगाव, आदी गावामध्ये तूर पिक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते बहुतांश शेतकरी मिश्र पिक घेतात त्यात कापूस आणी तूर या प्रमाणे लागवड केल्या जाते परंतु कापूस या पिकाला अमाप खर्च लागते व त्याप्रमाणे योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी पूर्ण तूर या पिकाची लागवड करतात.

Savner Taluka
 
गेल्या आठवड्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडी मुळे तुरीच्या शेंगा न भरताच पूर्ण तूर वाळत आहे त्यामुळे पूर्ण तूर पिक नष्ट झालेले आहे या प्रकारामुळे शेतकऱ्यावर उपसमारीची वेळ मात्र आलेली आहे. Savner Taluka मंगसा व इतर गावामधील शेतकऱ्यांनी योग्य चौकशी करून नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केलेली आहे.
सौजन्य: देवाशिष टोकेकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0