वर्धेच्या नवीन जिल्हाधिकारी वान्मथी सी.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची बदली

    दिनांक :24-Dec-2024
Total Views |
वर्धा,
Transfer of District Collector जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी राज्यकर मुंबईच्या सहआयुक्त वान्मथी सी.यांची वर्धेच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. असे पत्र मंगळवारी प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे मसूरी येथे प्रशिक्षणासाठी गेले आणि परत येण्यापूर्वीच त्यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून बदली करण्यात आलेली आहे. त्यांच्या जागी राज्य कर सहआयुक्त मुंबई येथील वान्मथी सी. वर्धेच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कर्डिले यांना विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार, पदभार देऊन त्वरित नाशिक येथे रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
 
 
 
collector 
 
 
  
जिल्हाधिकारी राहुल Transfer of District Collector कर्डिले हे संयमी आणि सर्वसामान्यांचे प्रश्‍न ऐकून त्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी नावारुपास आले होते. त्यांनी वर्धा येथील कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या. विधानसभेच्या निवडणुका होताच ते मसूरी येथे प्रशासकीय प्रशिक्षणासाठी गेले होते. मात्र, परत येण्यापूर्वीच त्यांच्या बदलीचे पत्र धडकले. ते आता नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. तर वर्धेच्या जिल्हाधिकारी म्हणून वान्मथी सी. यांची नियुक्त करण्यात आली आहे.