मातृत्त्व, पितृत्वानंतर आता हिंदुत्त्वही रूजावे

25 Dec 2024 19:31:21
तभा वृत्तसेवा
आर्वी, 
Sopan Maharaj Kanherkar : मातेमध्ये ममत्व, पित्यामध्ये पितृत्व असते त्याच प्रमाणे प्रत्येक हिंदूंमध्ये हिंदुत्व रुजल्या गेले पाहिजे. हिंदुत्वासाठी प्रत्येकाने समर्पीत व्हायला पाहिजे. मरण हे अंतीम सत्य आहे. सामाजाच्या देण्यासोबतच भगवंताच देणं लागतं. देव, देश आणि धर्मासाठी जगलं पाहिजे. समाजाला तुमचा आदर वाटल पाहिजे, असे आवाहन अमरावती येथील प्रवचनकार सोपन महाराज कन्हेरकर यांनी केले. संत परंपरा लाभलेल्या आर्वीनगरीत संत मायबाई द्विशताब्दी पुण्यतिथी महोत्सव, संत पांडुरंग महाराज पुण्यतिथी महोत्सव व संत अच्युत महाराज जन्मशताब्दी सांगता सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
aarvi
 
 
महाराज पुढे म्हणाले, तुम्ही किती दिवस जगता हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचं आहे. अवघाची संसार सुखाचीया व्हावा या प्रमाणे दुसर्‍याच्या सुखात आपलं सुख पाहिलं पाहिजे, असा संदेश सोपन महाराज कन्हेरकर मंगळवारी आयोजित कीर्तनात दिला. या शिवाय दानाच महत्त्व, योग्य वेळ साधने, समाजाच देणे लागनं, गर्व न करणे, संस्कृतीसह टिकली आणि टिळ्याचं महत्त्वही त्यांनी विषद केले.
 
 
यावेळी संत सचिन देव महाराज, माजी आमदार दादाराव केचे, हभप डॉ. नारायण निकम, सुधीर दिवे, वर्धा नागरी बँकेचे अध्यक्ष डॉ. विनय देशपांडे, वर्धा नागरी बँकेचे माजी अध्यक्ष अनिल जोशी, कृष्णा गिरधर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. महोत्सवाची सुरुवात संत मायबाई देवस्थान येथून पालखी सोहळ्याने झाली. सोमवारी सारेगम फेम प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला.
Powered By Sangraha 9.0