श्रीनिवास पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रिडा दिन उल्हासात साजरा

    दिनांक :26-Dec-2024
Total Views |
नागपूर,
श्रीनिवास पब्लिक स्कूल- श्रीनिवास पब्लिक स्कूल, सेमिनरी हिल्स येथे २१ डिसेंबरला वार्षिक क्रिडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता .डब्ल्यु ई.एस.चे उपाध्यक्ष डॉ.अविनाश देशमुख,  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अविनाश देशमुख यांनी केले .वार्षिक क्रिडा उत्सवाचे अतिथी डब्ल्यु .ई . एस , सचिव डॉ. नंदा राठी ,व्यवस्थापक- एस पी एस अविनाश पेंडसे डब्ल्यु. ई एस सदस्य, डॉ. हर्षा झरिया सी ए ओ , डब्ल्यु ई एस आणि प्राचार्य- प्रतिमा ढोके सर्व पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापिका डॉ. उन्नती दातार यांनी केले.

unti 
 
‘विविधतेत एकता’ याविषया अंतर्गत कार्यक्रमाची सुरुवात ‘सूर संगमाने झाली. भारतीय सांस्कृतिक लोकनृत्ये मोठ्या जोमाने सादर करण्यात आली.श्रीनिवास पब्लिक स्कूल या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे सामूहिक योग आणि त्यानंतर 'पसायदान'चे सामूहिक गायन हे होते. सर्व विद्यार्थी, शिक्षकआणि शिक्षकेतर कर्मचारीही यात सहभागी झाले. अनेशा सरकार आणि प्रिया बेन्सन यांनी सूत्रसंचालन, व आभार श्रद्धा शौरन यांनी मानले. सर्व विजेत्यांना हाऊस ट्रॉफी आणि पदक देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली होती .
सौजन्य:डॉ. उन्नती दातार,संपर्क मित्र