वर्धेच्या जिल्हाधिकारी पदभार स्वीकारण्यापूर्वी साई चरणी

26 Dec 2024 12:22:57
वर्धा, 
District Collector of Wardha आम्ही सुशिक्षित, आमचा अध्यात्मावर विश्‍वास नाही. देव, संत वगैरे थोतांड, अंधश्रद्धा म्हणणार्‍यांची संख्या वाढत असताना प्रथम श्रेणी अधिकारी देवत्त्वाला स्वीकारतात याचे ताजे उदाहरण म्हणजे वर्ध्याच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी आज गुरुवार 26 रोजी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी वर्धेतील साई मंदिरात येऊन मनोभावे दर्शन घेतले. एवढेच नव्हेतर प्रार्थना करताना ‘बाबा, आज पदभार स्वीकारत आहे. आशीर्वाद असू द्या,’ अशी साई चरणी प्रार्थना केली.
 
 
District Collector of Wardha
 
अतिशय गरीब परिस्थितीतून संगणक विषयात त्यांनी पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केली. जिद्द आणि चिकटीने शिक्षण घेऊन वान्मथी सी. जिल्हाधिकारी झाल्या. त्यांचे वडील कॅब चालक होते. 2015 च्या बॅचच्या आयएएस असलेल्या वान्मथी सी. यांनी 2018-19 मध्ये नंदूरबार येथे उपजिल्हाधिकारी, 2019 ते 22 या काळात त्या धुळे जिल्ह परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी होत्या. District Collector of Wardha त्यानंतर त्या राज्यकर सह आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांची वर्धा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. आज गुरुवारी त्या पदभार स्वीकारणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यापूर्वी त्यांनी वर्धेतील साई मंदिरात अतिशय साधेपणाने जाऊन दर्शन घेतले. यावेळी साई मंदिरचे सचिव सुभाष राठी, विश्‍वस्त मदन राठी, विठ्ठल व्यवहारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0