चहा पिण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कागदी कपावर बंदी

    दिनांक :29-Dec-2024
Total Views |
- जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी याकडे लक्ष देतील काय?

विजय आडे
उमरखेड, 
Ban on paper cups आजकाल सर्व चहाचे कॅन्टीन, हॉटेल व छोट्या मोठ्या समारंभात सर्रास वापरले जाणारे कागदी कप हे मानवी शरीरासाठी घातक असून त्यामुळे कॅन्सरसारखा होऊ शकतो. त्यामुळे याच्या वापरावर बंदी आवश्यक आहे. चहासाठी वापरल्या जाणार्‍या या कागदी कपांमध्ये ‘बिस्फेनॉल-ए’ नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. या कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपातील मायक्रो प्लॅस्टिक वितळते आणि चहासोबत लाखो मायक्रो प्लॅस्टिकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे.
 
 
umarkhed dksl
 
Ban on paper cups या चहाच्या कागदी कपांवर बंदी घालण्यात यावी. जेणेकरून सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक संस्था, दुकाने, समारंभ या ठिकाणी या कागदी कप वापराचा जो अतिरेक सुरू आहे, तो बंद व्हावा. प्लॅस्टिक पिशव्या, कटलरी, स्ट्रॉ, फूड पॅकेजिंग आणि डिस्पोजेबल पाण्याच्या बाटल्या यासारखी उत्पादने १ जुलै २०२२ पासून सरकारने बेकायदेशीर ठरवली आहेत. ‘बिस्फेनॉल-ए’चा बाळांना प्यायला देण्याच्या साहित्यामध्ये प्रतिबंधित आहे.
 
 
Ban on paper cups भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणार्‍या काही बाटल्या, कप आणि वाट्यांमध्ये हे विषारी रसायन आढळून आले आहे आणि ते बाळांच्या खाद्यपदार्थ्यांमध्ये मिसळल्या जात आहे. असे नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शहरात सध्या नगर प्रशासनाने प्लॅस्टिक पिशव्या जप्ती मोहीम राबविली आहे. तशीच मोहीम या विषारी आणि घातक असलेल्या कागदी कपांबाबत घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.