कारंजा लाड,
Shri Narasimha Saraswati Swami Maharaj : श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या ७२५ व्या जन्मोत्सवाला बुधवार १ जानेवारी पासून सुरुवात होणार असून १३ फेब्रूवारी पर्यंत चालणार्या या महोत्सवा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत आयोजित या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी १ तारखेला कलश स्थापना, श्री अखंड गुरू चरित्र पारायण, श्रींचा जन्म, अखंड विणावादन, हरिपाठ श्रींचा जन्म हे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. श्रींच्या जन्मोत्सवाचा समारोप रविवार १३ फेब्रुवार रोजी महाप्रसाद व श्रींच्या शैलगमन यात्रेने होईल. यादिवशी श्रींची आरती झाल्यावर दुपारी १२.३० पासुन महाप्रसाद वितरण व नंतर संध्याकाळी ६ पासून श्रींच्या पालखीची नगरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. उत्सव काळात मान्यवर, संत, कीर्तनकार, गायक, प्रवचनकार भजनी मंडळ यांचे भजन, कीर्तन, प्रवचन, गायन व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान भाविकांनी या उत्सवात सहभागी होऊन आपली सेवा श्रींच्या चरणी रुजू करावी, असे आवाहन येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.