नवी दिल्ली,
Marathi Sahitya Sammelan 2025 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत हाेणार आहे. सरहद संस्थेच्या माध्यमातून हा तीन दिवसीय साहित्याेत्सव आयाेजित करण्यात येणार आहे. वर्ष 2025 च्या फेब्रुवारीमध्ये आयाेजित या संमेलनाच्या तारखा आता जाहीर झाल्या असून, साहित्यरसिकांना संमेलनाचे वेध लागले आहेत. Marathi Sahitya Sammelan 2025 संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका ताराबाई भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले साहित्य संमेलन ठरणार आहे.
98 वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीतील तालकटाेरा स्टेडीयमवर हाेणार असून, तब्बल 7 दशकांंनंतर मराठी बाणा दिल्लीत गरजणार आहे. मुंबईत झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामाेर्तब करण्यात आलं. याआधी वर्ष 2014 मध्ये सरहद संस्थेने पंजाबच्या घुमान येथे मराठी साहित्य संमेलन आयाेजित केले हाेते. Marathi Sahitya Sammelan 2025 यापूर्वी, वर्ष 1954 मध्ये 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जाेशी यांच्या अध्यक्षतेत झाले हाेते, हे उल्लेखनीय!
दरम्यान, साहित्य संमेलनाच्या आयाेजनासाठी दिल्लीसह 7 ठिकाणचे प्रस्ताव आले हाेते. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी या तीन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कार्यक्रमस्थळांची पाहणी केली हाेती. गेल्या वर्षीचे साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे आयाेजिण्यात आले हाेते.Marathi Sahitya Sammelan 2025
वर्ष 2025 च्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हाेणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या त्रिदिवसीय साहित्य संमेलनाला 21 फेब्रुवारी राेजी सुरुवात हाेणार असून, 23 फेब्रुवारीला त्याचा समाराेप केला. या तीन दिवसांत भरगच्च कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे.Marathi Sahitya Sammelan 2025