कराळे मास्तर फरार; अंतरिम जामिनासाठी धावाधाव

    दिनांक :03-Dec-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Nitesh Karale : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी 20 रोजी उमरी मेघे येथील एका बुथवर जाऊन महिलेशी असभ्य वर्तन करून तिला जातीवाचक व अश्‍लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्टार प्रचारक नितेश कराळे यांच्यावर सावंगी पोलिसात जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी 29 नोव्हेंबर रोजी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच नितेश कराळे हे फरार असून अंतरिम जामिनासाठी त्यांची धावाधाव सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल दाखल केल्यानंतर आज 3 रोजी सुनावणी झाली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी काय झाले ती माहिती कळू शकली नाही.
 
 
 
karale
 
 
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी कराळे मास्तर परिवारासह मांडवा येथे मतदान करण्यासाठी गेले होते. मतदान करून ते वर्धेला परत येत असताना उमरी येथे थांबले. उमरी येथील एका बुथवर त्यांनी विनाकारण वाद घातला. यावेळी बुथवरील एका महिलेला अश्‍लिल व जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी त्यांना चांगलाच चोप दिला. घटना लक्षात येताच पोलिसांनी कराळे मास्तरला सावंगी पोलिस ठाण्यात आणले. यावेळी पोलिसांनी विविध गुन्ह्यांसह आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. दरम्यान, 29 नोव्हेंबरला नितेश कराळे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच कराळे मास्तर फरार झाले. आता अंतरिम जामिनासाठी त्यांची धावाधाव सुरू कोर्टाच्या कचाट्यात सापडले आहे. यासंदर्भात नितेश कराळे फरार असून त्यांना अद्याप अटक झाली नसल्याची माहिती पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी तरुण भारत सोबत बोलताना दिली.
 
 
स्टार प्रचारकाचे नियम
 
 
गेल्या 4 वर्षांपासुन राज्यात खदखद मास्तर म्हणून ओळखल्या जाणाले नितेश कराळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने हेरून प्रदेश प्रवक्ता नेमून स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिली होती. परंतु, स्टाल प्रचारकाचे काही नियम असतात. त्या नियमांची माहिती असती तर नितेश कराळे वाहना खाली उतरून त्यांनी हा प्रसंग ओढवून घेतला नसता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.