सत्यसाई बहुद्देशीय संस्थेतर्फे आगळा- वेगळा कार्यक्रम

03 Dec 2024 12:19:59
नागपूर,
Sai Sawali Old Age Home : सत्यसाई बहुद्देशीय संस्थेद्वारा संचालित 'साई सावली वृद्धाश्रम' या अंतर्गत 'गंध आपुलकीचा' हा ऋृणानुबंधचा एक आगळा- वेगळा कार्यक्रम दरवर्षी दिवाळीच्या निमित्त आयोजित करतात. या वेळेस चिचगड, शेंडामोहाघाटा, आपकारी टोला, कणारपायली, उसिखेडा, मसराम टोला, पुतळी, पांढरवाणी तालुका देवरी जिल्हा गोंदिया या आदिवासी दुर्गम वस्तीतील गोंड नावाच्या आदिम जाती जमाती मधील आदिवासी लोकांना (४०० लोकवस्ती) गावात जाऊन तेथील प्रत्येक कुटूंबाला एक साडी, शर्ट-पॅंन्ट, ब्लॅंकेट व फराळाचे पॅकेट वाटप करण्यात आले. या उत्तम प्रकल्पा अनेक दात्यांचा सहभाग लाभला. वस्त्र रुपात (नवीन) किंवा रोख स्वरूपात मदत केली गेली. त्याची रितसर पावती देण्यात आली. या साठी अध्यक्ष डॉ. विनोद केळझरकर,सचिव विशाखा मोहोड. नगरसेविका यांनी परिश्रम घेतले. प्रकाश महाडिया दुर्गा देवी मंदिर सुयोग नगर यांनी भरघोस मदत केली.
सौजन्य: स्मिता बोकरे, संपर्क मित्र
 
Sai Sawali Old Age Home
Powered By Sangraha 9.0