सखी सावित्री समिती तर्फे पालक सभा संपन्न

    दिनांक :03-Dec-2024
Total Views |
नागपूर,
Sakhi Savitri Committee : लोकशिक्षण संस्थे अंतर्गत चालणाऱ्या लोकांची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे सखी सावित्री समिती पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभू देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. वि स जोग, सचिव मनोहर ढोक, शाळेच्या प्राचार्या रजनी राजुरकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात अंबिका रणनवरे महिला पोलिस कॉन्स्टेबल यांनी विद्यार्थ्यांच्या सामजिक सुरक्षिततेसंबंधी चिंता व्यक्त केली.
 
Sakhi Savitri Committee
 
आजचा विद्यार्थी मोबाईलच्या प्रचंड आहारी गेला आहे, त्यातून त्याला बाहेर आणणे ही पालक म्हणून आपली जबाबदारी असल्याचे व पालकांच्या कर्तव्या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे अतिथी डॉ.वि स जोग यांनी कौटुंबिक वातावरण संवादी असण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे भाष्य केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्रभूजी देशपांडे यांनी मुलांच्या सवयी आणि मुलांच्या अनुकरणशील वृत्ती विषयी मार्गदर्शन केले. Sakhi Savitri Committee कार्यक्रमाला स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.कांची जैन, पोलिस कॉन्स्टेबल शारदा राऊत, अंगणवाडी सेविका सुवर्णा डोंगरे, पालक प्रतिनिधी पुनम मेंढे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माला केचे, पर्यवेक्षक श्रीकांत देशमुख, कला विकास मंडळ अध्यक्ष आशिष टेंभेकर उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन जयश्री धात्रक यांनी केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पालक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.
सौजन्य: स्वाती मोहरीर, संपर्क मित्र