नागपूर-मडगाव-नागपूर विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ

    दिनांक :31-Dec-2024
Total Views |
नागपूर,
Nagpur-Madgaon-Nagpur Special Express : नागपूरसह विदर्भातील गोव्यात पर्यटनाला जाण्यासाठी नागपूर - मडगाव नागपूर द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही विशेष गाडी आता १ जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत धावणार आहे. नागपूर - मडगाव एक्स्प्रेस (०११३९) ही द्विसाप्ताहिक गाडी १जानेवारी २०२५ पासून नागपूर स्थानकावरून दर बुधवार व शनिवारी दुपारी ३:०६ मिनिटांनी सुटून मडगाव येथे दुसर्‍या दिवशी ५:४६ वाजता पोहोचेल.
 
 
Nagpur-Madgaon
 
Nagpur-Madgaon-Nagpur Special Express : परतीच्या प्रवासात मडगाव -नागपूर एक्स्प्रेस (०११४०) ही द्विसाप्ताहिक गाडी २ जानेवारी २०२५ पासून दर गुरुवार व रविवारी मडगाव स्थानकावरून रात्री ८:०१ वाजता सुटून दुसर्‍या दिवशी रात्री ९:३१ वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल. नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) या प्रवासात ही गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूररोड, कणकवली, कुडाळ, थिवी (गोवा) तसेच करमाळी (गोवा) या स्थानकांवर थांबणार आहे.