- डॉ. वृषाली जोशी यांचे प्रतिपादन
- ३९ वी-रमाबाई रानडे स्मृती व्याख्यानमाला
नागपूर,
अवघ्या विश्वाचे कल्याण व्हावे, असा कालमंत्र भारताने संपूर्ण विश्वाला दिला आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करीत विश्वकल्याणाचा विचार मांडणारा भारत हाच एकमेव देश असल्याने आगामी भारत विश्वगुरु होईल, असा विश्वास विश्वमांगल्य सभेच्या अखिल भारतीय संघटनमंत्री Dr. Vrushali Joshi डॉ. वृषाली जोशी यांनी व्यक्त केला.
उत्तर अंबाझरी मार्ग, सीताबर्डी येथील सेवासदन शिक्षण संस्थेच्या परिसरात कै. डॉ. वसंतराव वांकर व कै. डॉ. कुसुमताई वांकर पुरस्कृत ३९ वी-रमाबाई रानडे स्मृती व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर सेवासदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष गडकरी, सचिव वासंती भागवत, ए.व्ही.आय.फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जेरील बानाईत होते. भारतीय समाजव्यवस्थेसमोरील आव्हाने व उपाय हा व्याख्यानाचा विषय होता.
समाजव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने
Dr. Vrushali Joshi डॉ. वृषाली जोशी आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाल्या, आजच्या घडीला भारतीय समाजव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने उभे आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील आजार दूर करण्यासाठी डॉक्टर योग्य वेळी योग्य उपचार करुन बरे करीत असतो. त्याप्रमाणे भारतीय समाजातील समस्या मुळापासूनच सोडविण्यासाठी ठोस निर्णयाची गरज निर्माण झाली आहे. भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी जातीभेद, भाषाभेद न पाळता सर्व समाजाने एक भारतीय म्हणून राहण्याची आवश्यकता आहे.
भारतीय विचारधारा सर्वांच्या हितासाठी
वसुधैव कुटुंबकम् प्रमाणे भारतीय समाजाने निष्ठापूर्वक देशाच्या विकासात योगदान देत आले आहे. यानंतर सुध्दा भारतीय समाज, संपूर्ण विश्व एक आचार, एक विचाराप्रमाणे मार्गक्रमण केल्यास विश्वाचे कल्याणच होणार आहे. समाजाच्या हितासाठी चांगल्या गोष्टींऐवजी चुकीच्या गोष्टी पसरविल्या जात आहे. त्यामुळे आपल्या देशाचे मोठे नुकसान होण्यापासून वाचविणे हे सुध्दा आपलेच कर्तव्य आहे. विषमतेचे बीज पेरण्याचे काम विदेशी संघटना वेगाने करीत आहे. तर भारतीय विचारधारा सर्वांच्या हिताचा करीत विश्व कल्याणाचा मंत्र देत आहे.
सावध होण्याची गरज
भारतीय संस्कृतीने एकत्रित कुटूंबांचा संदेश कायम राखल्यामुळेच कोविड काळात विविध समस्यांचा सामना करीत समाजाला वाचविले आहे. आपल्यावर चांगले संस्कार झाल्यामुळेच आज आपण अनेक समस्यांचा सामना करीत यश मिळवित आहे. केवळ भाषा व भोजनाच्या कारणामुळेच बांगलादेश भारतापासून वेगळा झाला होता. भविष्यात कोणताही प्रकार होउ नयेत,यासाठी जातीभेद, भाषाभेद, भोजन भेद कायमचे मिटविण्याची नितांत गरज आहे. भविष्यातील समस्या येण्यापूर्वीच आजच सावध झाल्यास समाजव्यवस्थेवर कोणत्याही प्रकारेच आव्हाने येणार नाही, असेही Dr. Vrushali Joshi डॉ. वृषाली जोशी म्हणाल्या.
समाजाचा कोणताही चेहरा नसतो.आपले विचार सकारात्मक असल्यास समाजक्रांती होण्यास वेळ लागणार नाही, असे स्पष्ट मत डॉ. जेरील बानाईत यांनी अध्यक्ष म्हणून मांडले. यावेळी प्रामुख्याने बापूसाहेब भागवत, समय बन्सोड, माजी न्या. मिरा खडक्कार, रवी देशपांडे आदी उपस्थित होते. संचालन व आभार राजश्री पिंपळघरे यांनी केले. गुरुवार ५ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वा. परिवार व्यवस्था समाजाचा मुळ आधार या विषयावरील व्याख्यानात अध्यक्ष म्हणून इन्डोहर्बलच्या प्रोप्रायटर शची मलिक तर प्रमुख वक्ते विश्वमांगल्य सभेच्या अखिल भारतीय संघटनमंत्री डॉ. वृषाली जोशी राहतील.