माजी आमदारांकडून जिल्हाधिकार्‍यांचे अभिनंदन

04 Dec 2024 18:49:51
गडचिरोली,
congratulate District Collector गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व अहेरी या तिन्ही विधानसभा क्षेत्रातील निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी मोलाची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
 
  
collector
 
  
जिल्हाधिकारी कार्यालय congratulate District Collector गडचिरोली येथे झालेल्या या भेटीदरम्यान, आमदार डॉ. होळी यांनी गडचिरोली येथे नव्याने प्रवेश प्रक्रिया होणार्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अडलेल्या कामांना सहकार्य करण्याची विनंती केली. त्याचबरोबर, गडचिरोली येथील जिल्हा स्टेडियमचे टप्पा २ बांधकाम लवकरात लवकर कसे सुरु करता येईल या संदर्भात विशेष लक्ष देण्याबाबत सूचना केली. तसेच मार्कंडा देवस्थान विकासासाठी आणलेल्या शंभर कोटी रुपयांच्या कामांची सुरुवात लवकरात लवकर करावी व मार्कंडेेश्‍वर मंदिराच्या जीर्णोद्धाराकडेही लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी या भेटीप्रसंगी जिल्हाधिकार्‍यांकडे केली.
Powered By Sangraha 9.0