नागपूर,
Shri Dutt Jayanti : श्रीनगर जन्मोत्सव समिती तर्फे, श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन प्रति वर्षानुसार करण्यात आले आहे. श्रीनगर येथील श्री दत्त मंदिर प्रांगणामध्ये श्री दत्त गुरु सप्ताह महोत्सव होणार असून सप्ताह भरात या उत्सवात विविध धार्मिक सांस्कृतिक अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. रविवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता श्री गुरुचरित्र पारायणाचा प्रारंभ श्रद्धेय शेखर जोशी यांच्याकडून होईल.
दुपारी ४:०० वाजता माऊली भजन मंडळातर्फे भजन होणार असून सोमवार दिनांक ९ डिसेंबर रोजी दुपारी ४:०० वाजता राधाकृष्ण महिला भजन मंडळातर्फे भजन, मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी दुपारी ४:०० वाजता अभिरुची महिला मंडळ सुंदरवन तर्फे भजन, बुधवार दिनांक ११ डिसेंबरला दुपारी ४:०० वाजता वासवी महिला भजन मंडळ नरेंद्र नगर तर्फे भजन, गुरुवार १२ डिसेंबरला दुपारी ४:०० वाजता गायत्री महिला भजन मंडळ सुयोग नगर तर्फे भजन, रात्री ८:०० वाजता श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ तर्फे भजन, शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर दुपारी १:०० वाजता श्रद्धेय मठाधीपती माधवानंद महाराज सालोड यांचे प्रवचन, रात्री ७:३० वाजता स्वर स्वरांगिनी द्वारा भजन संध्या या संगीत कार्यक्रमाची प्रस्तुती, शनिवारी १४ डिसेंबर दुपारी ४:०० वाजता दत्त जयंती निमित्त प्रा. शांताराम ढोले महाराज यांचे दत्त जन्माचे कीर्तन होईल. Shri Dutt Jayanti रविवार दिनांक १५ डिसेंबरला दत्त जयंती महोत्सव महोत्सवाची सांगता मंदिर परिसरामध्ये दुपारी १२:०० वाजता गोपालकाला व दहीहंडी काल्याच्या कीर्तनाने होईल. सायंकाळी ६:०० वाजता महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होईल. या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन महोत्सव समिती तर्फे अध्यक्ष श्रीकांत बढे, सचिव शाम वदनलवार व कोषाध्यक्ष कृष्णराव ठाकरे यांनी केले आहे.
सौजन्य: सुनील गव्हाणे, संपर्क मित्र