मीठ कधी खराब होऊ शकते का?

त्याची एक्सपायरी डेट जाणून घ्या

    दिनांक :08-Dec-2024
Total Views |
Salt Expiry मीठ अन्नात अतिशय काळजीपूर्वक मिसळले जाते. चुकूनही जास्त मीठ अन्नात मिसळले तर त्याची चव खराब होऊ शकते. परंतु, तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? की मिठाचीसुद्धा एक्सपायरी डेट असते.
मीठाशिवाय अन्न अपूर्ण आहे. मीठाशिवाय अन्नाला चव नसते. स्वयंपाक करताना कितीही मसाले वापरले तरी मीठ घातल्याशिवाय जेवणाला चव येत नाही. मीठ हा एक प्रकारचा खनिज आहे, जो सोडियम क्लोराईडपासून बनलेला असतो. आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ.
मसाले, भाज्या किंवा कडधान्ये – स्वयंपाकघरात असलेल्या या सर्व गोष्टी काही काळानंतर खराब होतात पण मीठ कधी खराब होते का? मीठ अत्यंत काळजीपूर्वक वापरले जाते. खूप जास्त मीठ संपूर्ण अन्नाची चव बिघडवते. पण अनेकवेळा मीठ घातल्यानंतरही जेवणाला चव येत नाही. म्हणजे मीठ संपले आहे का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया...
 
 
salt3
 
 
 
 
मीठ कधी संपुष्टात येऊ शकते का?
सामान्य मीठामध्ये Salt Expiry सोडियम क्लोराईड असते. जे रासायनिकदृष्ट्या स्थिर असते. याचा अर्थ मिठावर वेळेचा विशेष परिणाम होत नाही, म्हणजेच ते कधीच संपत नाही. मिठात जिवाणू किंवा बुरशीची वाढ होण्याची शक्यता नसते. अन्न खराब करणाऱ्या बॅक्टेरियांना वाढण्यासाठी आर्द्रता आवश्यक असते, परंतु शुद्ध मीठामध्ये पाणी नसते. त्यामुळे, ते खराबही नाही होत.
मीठ कालबाह्य का होत नाही?
मीठ खराब न होण्याचे एक कारण म्हणजे, ते अनेक सूक्ष्मजंतूंसाठी धोका आहे. नॅशनल ॲकॅडेमिक्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार, अन्नामध्ये मीठ मिसळल्याने सूक्ष्मजीव पेशींना ऑस्मोटिक शॉक लागतो. यामुळे, सूक्ष्मजीव पेशींमधून पाण्याची कमतरता असू शकते. या प्रक्रियेमुळे सूक्ष्मजीव पेशी वाढू शकत नाहीत.
हे लक्षात ठेवा
अमेरिकेच्या कृषी Salt Expiry विभागाच्या मते, शुद्ध मीठ कधीही खराब होत नाही. परंतु, रिफाइंड सी सॉल्ट मध्ये समुद्री शैवाल असतात. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आयोडीनयुक्त मिठात आयोडीन रसायन असते. टेबल व कोशर सॉल्टमध्ये अँटी-केकिंग एजंट असतात, जे कालांतराने खराब होऊ शकतात. यामुळे मिठात ओलावा येऊ शकतो आणि त्यात गुठळ्या तयार होऊ शकतात.