बांग्लादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ आज जनआक्रोश न्याययात्रा

09 Dec 2024 19:55:28
गडचिरोली,
Jan Akrosh Yatra हिंदूंवरील अत्याचार ताबडतोब थांबावे तसेच बांग्लादेशातील स्थिती रूळावर यावी आणि तेथील हिंदू समाजाचे जीवन सुकर, सुरक्षित व्हावे. यासाठी, सकल हिंदू समाजातर्फे मंगळवारी जनआक्रोश न्याय यात्रा काढण्यात येईल. ही जनआक्रोश न्याय यात्रा स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणातून दुपारी २ वाजता देवकुले पटांगणाकडे निघेल. या पटांगणात यात्रेचे रूपांतर निषेध सभेत होईल. या सभेत प्रमुख वक्ते मार्गदर्शन करतील. त्यानंतर काही निवडक पदाधिकारी भारत सरकारसाठी लिहिलेले मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देतील. या जनआक्रोश न्याययात्रेत ५ ते७ हजार हिंदू सहभागी होणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
 
 
 
press 1
 
 
 
पुढे ते म्हणाले,Jan Akrosh Yatraबांग्लादेशात जिहादी कट्टरवाद्यांनी अस्थिरता निर्माण केली असून, त्या देशातील हिंदू, बौद्ध, ख्रिश्‍चन यांच्यासह अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्यात येत आहेत. भारत सरकारने हस्तक्षेप करून हे अत्याचार थांबवावे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परीषद, अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या पदाधिकार्‍यांनी रविवारी पत्रकार परीषदेतून केली. या अत्याचारांच्या निषेधार्थ जागतिक मानवाधिकार दिनी उद्या मंगळवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने शहरात जनआक्रोश न्याय यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आले.यावेळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक घिसूलाल काबरा, नगर संघचालक अ‍ॅड. नीळकंठ भांडेकर, जिल्हा संपर्कप्रमुख हेमंत राठी, प्रचार प्रमुख राकेश इनकने, विश्‍व हिंदू परिषदेचे नगरमंत्री आयुष न्यालेवार, अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे विभाग प्रमुख प्रा. धर्मेंद्र मुनघाटे आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0