आमदार आकाश फुंडकर यांनी घेतली तिसऱ्यांदा विधानसभा सदस्यत्वाची शपथ
दिनांक :09-Dec-2024
Total Views |
खामगांव,
MLA Akash Fundkar खामगांव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार अॕड. आकाश सुनिता पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांनी आई वडील व खामगाव विधनसभा मतदार संघातील जनतेचे स्मरण करून सदस्य पदाची शपथ घेतली. खामगांव विधानसभा मतदार संघातून पैश्याच्या जोरावर निवडून येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस उमेदवाराला भाजपा आमदार आकाश फुंडकर यांनी मागचा रेकॉर्ड मोडीत काढत 25000 मताधिक्याने पराभूत केले, आणि त्यांच्यासह अनेकाचे स्वप्न धुळीस मिळवले.
आकाश फुंडकर यांनी मागिल दशकात केलेल्या समग्र व शाश्वत विकासाच्या भरोस्यावर काँग्रेस उमेदवाराचा दारुण पराभव केला. यावेळी प्रतिक्रिया देताना आमदार आकाश फुंडकर म्हणाले की, आज माझ्यासाठी केवळ शपथ घेण्याचा दिवस नाही, तर तुमच्या विश्वासाचा आणि प्रेमाचा मान राखण्याचा क्षण आहे. सलग तिसऱ्यांदा खामगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून शपथ घेताना मनात फक्त एकच विचार आहे – हा विजय तुमचाच आहे. MLA Akash Fundkar तुमच्या विश्वासाने मला कायम नवी ऊर्जा दिली. तुमच्या अपेक्षांनी मला जबाबदारीची जाणीव करून दिली. आज संविधानाला साक्ष ठेवून ही शपथ घेताना, मी तुमच्याशी पुन्हा वचनबद्ध होतो की, तुमच्या विकासासाठी, तुमच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या हक्कासाठी अहोरात्र झटत राहील. खामगावच्या प्रत्येक मतदाराचे हे प्रेम, विश्वास, आणि आशिर्वाद यांचा मी ऋणी आहे. हा विजय तुमच्या सेवेसाठी अर्पण आहे. अशी मतदाराप्रती कृज्ञतापूर्वक विधान केले.