विदर्भस्तरीय विज्ञान उत्सवासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

09 Dec 2024 14:26:33
अकोला, 
science festival विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळाच्या विदर्भस्तरीय विज्ञान उत्सवाचे आयोजन ज्यूबिली इंग्लिश हायस्कूल, सीबीएससी, कुंभारी, येथे २१ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या विज्ञान उत्सवामध्ये इयत्ता ८वी ते ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मॉडेल्स, रांगोळी आणि पोस्टर प्रदर्शनाचे स्पर्धात्मक आयोजन केले आहे.
 
 
science festival
 
विज्ञान उत्सवासाठी आरोग्य विज्ञान, कृषी आणि पर्यावरण या तीन विषयांची निवड करण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच ज्यूबिली इंग्लिश हायस्कूल, सीबीएससी, कुंभारी येथे करण्यात आले. स्पर्धकांसाठी प्रस्ताव सादरीकरणाची अंतिम तारीख १२ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. science festival विज्ञान भारती अकोला यांच्यातर्फे सर्व शाळा व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रकल्प प्रस्ताव दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले.

या स्पर्धेतील रांगोळी व पोस्टर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक : ₹५००, द्वितीय पारितोषिक : ₹३००
विज्ञान मॉडेल स्पर्धेच्या जिल्हास्तरा करिता प्रथम पारितोषिक : ₹१५००, द्वितीय पारितोषिक : ₹१००० तर विदर्भस्तरासाठी प्रथम पारितोषिक ₹५०००, द्वितीय पारितोषिक ₹३००० देण्यात येणार आहे.
या विज्ञान उत्सवामध्ये विद्यार्थ्यांना विज्ञानातील नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून आपली सर्जनशीलता आणि संशोधनात्मक कौशल्ये सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेत प्रवेश विनामूल्य आहे. science festival विद्यार्थ्यांनी या विज्ञान उत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विज्ञान भारतीद्वारा करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0