आसेगाव (देवी) येथे आढळला दुर्मिळ जातीचा साप

    दिनांक :01-Feb-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Rare breed snake : वन्यजीवरक्षक दुशांत शेळके यांना बाभुळगाव तालुक्यातील आसेगाव (देवी) येथे दुर्मिळ जातीचा पिवळ्या ठिपक्यांच्या कवड्या साप आढळून आला. आसेगाव (देवी) येथील नागरिक गौरव सुखदेव आरेकर यांनी त्यांच्या घरात साप असल्याची माहिती फोनद्वारे जाणीव एक हात मदतीचे वन्यजीवरक्षक दुशांत शेळके यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून हा साप पकडला. सापाचे निरीक्षण केल्यावर हा साप पिवळ्या ठिपक्यांच्या कवड्या साप असल्याचे निदर्शनास आले. या सापाला जाणीव एक हात मदतीचा यवतमाळ जिल्हाध्यक्ष दिनेश तिवाडे यांच्या समवेत वन विभागात नोंद करून जंगलात मुक्त केले.
 
Rare breed snake
 
हा Rare breed snake साप बिनविषारी आहे. दुर्मिळ जातीचा हा साप काळ्या रंगाचा असून शरीरावर पिवळे ठिपके व आडवे पट्टे आहेत. पोटाकडील भागावर पांढरे ठिपके आहेत. या सापाची लांबी एक ते दीड फूट एवढी असते. बिनविषारी असलेला हा साप देशात फार कमी ठिकाणी आढळतो. सर्वसाधारणपणे यापूर्वी मध्यभारत, उत्तर-पश्चिम घाट, मध्य पश्चिम भारत या भागामध्ये या सापाची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पश्चिम घाट जवळील काही भागात तसेच नाशिक, पुणे, मुळशी, तळेगाव, सांगली, बुलढाणा, गुजरातमधील काही भागात आढळल्याचे समजते.
 
 
हा Rare breed snake साप शांत व लाजाळू असून त्यांचे मुख्य अन्न पाली, सरडे, कीटक आहेत. विदर्भात या सापाची प्रजाती आढळून येत नाही, अशी माहिती वन्यजीवरक्षक दुशांत शेळके यांनी दिली. कुठेही साप अथवा वन्यप्राणी धोक्यात किंवा जखमी अवस्थेत आढळल्यास 'जाणीव एक हात मदतीचा' या संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.