गांजाची लागवड करणारा आरोपी जाळ्यात

तब्बल 12 किलो गांजा जप्त

    दिनांक :01-Feb-2024
Total Views |
दहीहांडा पोलिसांची कारवाई
अकोला,
Ganja Cultivator दहिहांडा पोलिस ठाण्या अंतर्गत करतवाडी येथे एका इसमाने गांजाच्या झाडाची लागवड त्याच्या घराच्या अंगणात केली असल्याची खात्रीलायक माहिती पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे व त्यांच्या पथकाला सोमवार 29 जानेवारी रोजी मिळाली होती.पोलिसांनी तत्काळ याची दखल घेत आरोपीच्या घरी छापा घातला व त्याच्या घरातून तब्बल 12 किलो गांजा जप्त केला आहे.या प्रकरणी आरोपीस अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
 
 

Ganja Cultivator
 
हा प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिस अधीक्षकांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा करून एनडीपीएस कायद्या अंतर्गत कडक कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिली. Ganja Cultivator लागलीच ठाणेदार योगेश वाघमारे यांनी एक पथक तयार केले. सव कारवाई करिता उपविभागीय पोलिस अधिकारी अनमोल मित्तल हे स्वतः उपस्थित राहिले.त्या नंतर पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्राम करतवाडी येथे छापा मारला असता आरोपी अजाबराव रामदास किरडे याने स्वतःचे घराचे अंगणात 12 गांजाची झाडे लावल्याचे पोलिसांना आढळले.
 
पोलिस पथकाने त्या झाडांचा पंचासमक्ष पंचनामा करून 12 किलो वजनाची सुमारे 1,20,000 किंमतीची गांजाची झाडे ताब्यात घेवून आरोपी अजाबराव किरडे याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालय समक्ष हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. आरोपीकडून अजून काही माहिती निष्पन्न होते का याचा तपास दहीहांडा पोलिस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे व सह पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे, उपनिरीक्षक अरूण मुंढे, एएसआय अंबादास नेरकर, कॉन्स्टेबल गोपाल अघडते, सुधाकर सिरसाट, शरद सांगळे, अनिल भांडे, कमोद लांडगे, योगेश करणकार, रामेश्वर भगत, नीलेश देशमुख, श्रद्धा वानखडे, प्रकाश महाजन, सुधीर कोरडे, हेमंत दासरवार यांनी केली.